ETV Bharat / state

'चितळ'ची शिकार करुन शिजवलेले मांस विक्री करणाऱ्या आरोपीला अटक - Chital hunting and meat sale case

सडक अर्जुनी तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव डेपो यासह वनपरिक्षेत्रातील खडकी परिसरात चितळ शिकार प्रकरणी एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे.

Chital hunting case gondia
चितळ शिकार आणि मांस विक्री प्रकरणी सडक अर्जुनी तालुक्यात आरोपीला अटक
author img

By

Published : Jul 17, 2020, 8:41 PM IST

गोंदिया - डोंगरगाव डेपो परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे सदर परिसरात वन्य प्राण्यांचा अधिवास अधिक प्रमाणात आहे. तसेच या परिसराला नवेगाव-नागझिरा अभयारण्य लागून असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी ये-जा करत असतात. तसेच हे ठिकाण बफरझोन असून खडकी परिसरात येते. त्यामुळेच या भागात वन्य प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असते.

चितळ शिकार आणि मांस विक्री प्रकरणी सडक अर्जुनी तालुक्यात आरोपीला अटक...

अशाच प्रकारे चितळची शिकार झाली असल्याची माहिती सडक-अर्जुनी वन विभागाला मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी आपल्या पथकासह चितळची शिकार करून त्याचे मांस शिजवत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी मांस शिजवणाऱ्या वसंत सुका मेश्राम (५१) याला अटक केली.

हेही वाचा - 'घरीच नमाज अदा करा', बकरी ईद साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

वनविभागाने आरोपीला ताब्यात घेतले असून भारतीय वन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयात हजर केले आहे. झालेल्या चितळ प्रकरणात इतर जर मुख्य आरोपी असतील तर ते लवकरच पकडले जातील अशी माहिती देखील वनविभागाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.