गोंदिया - अभिनेता विजय राजच्या अडचणीत वाढ झाल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याची तक्रार गोंदियाच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. शेरनी चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
प्रशासनाकडून सारवासारव
शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणाविषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. हॉटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात येत असून पत्रकारांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.
कोण आहे विजय राज ?
राम गोपाल वर्मा यांच्या 'जंगल' चित्रपटातून विजय राज यांना फिल्मी जगतात पहिली संधी मिळाली. यानंतर तो महेश भट्ट यांच्या 'भोपाल एक्स्प्रेस' आणि 'मॉन्सून वेडिंग' चित्रपटात पीके दुबेच्या पात्रात दिसला. प्रेक्षकांना त्याची ही कॉमिक शैली आवडली. त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडूनही खूप कौतुक झाले. तसेच, या चित्रपटांत त्यांच्या कॉमिक शैलीसाठी त्याला अनेक नामांकने मिळाली. रघू रोमियो म्हणून राजला पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटातील त्याचे पात्र प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडले होते.
कव्वा बिरयानी सीन
२००४ साली अभिषेक बच्चन आणि भूमिका जुही चावला यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'रन' या चित्रपटात तो दिसला. हा चित्रपट तेवढा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही पण विजय राजची भूमिका हिट झाली. या चित्रपटात त्याने आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमिक टायमिंगद्वारे प्रेक्षकांना हसवले. यातला त्याच्या कव्वा बिरयानीचा सीन अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हा सीन अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतो. या चित्रपटानंतर तो 'डेली-बेली' या चित्रपटातही दिसला होता.