गोंदिया - तलावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी समोर आली आहे.
गोंदियातील नंगपुरा मुर्री येथे मंगळवारी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह तलावात आढळुन आला. याबाबत एका युवकाने रामनगर पोलीस ठाणे येथे माहिती दिली. श्रीनगर येथील एका अल्पवयीन मुलीची सोमवारी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आली. तसेच तिला तलावात फेकले. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तसेच दोघेही आत्महत्या करण्यासाठी गेले होते. त्यात मुलीचा तलावात बुडून मृत्यु झाला. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली की आत्महत्या? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
यावर उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या मागर्दशनात शहर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर व त्यांची पथकाव्दारे चौकशी केली जात आहे. मृताचे शव तलावातुन काढुन जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.याप्रकरणी रामनगर पोलिसांनी नोंद केली आहे.