गोंदिया - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. त्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार नक्षलग्रस्त भागातील महिला-पुरुषांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील केशोरी या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य ब्लड बँक गोंदिया यांच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले. फिजिकल अंतर, मास्क आणि स्वच्छतेचे पालन करीत नागरिकांनी रक्तदान केले. यात ४३ आदिवासी बांधवांनी पुढाकार घेतला.