ETV Bharat / state

ETV Bharat Impact : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीचा दणका; बिरसी गावातील 106 कुटुंबियांना मिळणार हक्काचा भूखंड

author img

By

Published : Apr 5, 2022, 10:02 PM IST

Updated : Apr 5, 2022, 10:28 PM IST

गोंदियाच्या बिरसी विमानतळासाठी ज्या १०६ कुटूंबियांनी आपली जागा, शेती आणि घरे दिली अशा प्रकल्पग्रस्त लोकांना १३ वर्षे लोटूनही जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे बिरसी गावातील (Birsi Village) १०६ कुटूंबियांनी बिरसी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण करत घर बांधकामाला सुरुवात केली होती. ही बातमी सर्वात प्रथम ईटीव्ही भारतने दाखवली होती.

Birsi village
बिरसी गावकऱ्यांना हक्काचा भूखंड

गोंदिया - गोंदियाच्या बिरसी विमानतळासाठी ज्या १०६ कुटूंबियांनी आपली जागा, शेती आणि घरे दिली अशा प्रकल्पग्रस्त लोकांना १३ वर्षे लोटूनही जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे बिरसी गावातील (Birsi Village) १०६ कुटूंबियांनी माजी सरपंच रवींद्र तावडे यांच्या पुढाकाराने बिरसी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या १६ एकर जागेवर अतिक्रमण करत सामूहिक भूमिपूजन करत घरे बांधकामाला सुरुवात केली होती. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने सर्वप्रथम २१ मार्चला प्रकाशित केली. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.

ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा

ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेली बातमी - जमीन देऊनही मोबदला नाही.. गोंदियाच्या बिर्शी विमानतळासमोर संतप्त १०६ कुटुंबियांकडून अतिक्रमण

गावकऱ्यांनी ईटीव्ही भारतचे मानले आभार - खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत तोडगा काढण्यास सांगितले. त्यामुळे ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. बिरसी गावातील १०६ कुटूंबियांना त्यांची घरे बांधण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आज स्वतः उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी गावकऱ्यांना देण्यात येणारी जागा दाखवली व पाहणी करत बिरसीवासियांना त्यांच्या हक्काची घरे बांधण्याकरिता जागा मिळणार आहे. त्यामुळे गावकऱयांनी ईटीव्ही भारतचे आभार मानले आहेत.

Birsi village
बिरसी गावकऱ्यांना मिळणार हक्काची जागा

काय आहे प्रकरण? - गोंदिया शहराला लागून असलेल्या बिरसी गावात ब्रिटिशकालीन विमानातळ होते. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी येथे असलेले विमानतळाची नासधूस झाल्याने माजी केंद्रीय उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांनी उड्डाण मंत्र्यालयाची धुरा सांभाळताच. बिरसी गावात २००९ साली विमानतळ तयार केले. यासाठी २००५ पासून भूमी अधिग्रहनला सुरुवात झाली होती. एकट्या बिरसी गावातील ९७ हेक्टर शेत जमीन तसेच अंदाजे ३ लक्ष १८ हजार चौरस फूट जागा विमानतळ प्राधिकरणाने आपल्या ताब्यात घेतली होती. मात्र, आज या घटनेला १३ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर गावकऱयांना न्याय मिळाला नाही. त्यांच्यासाठी जवळपास १३ एकर जागेवरही नवीन वसाहत तयार करण्यात आली. या ठिकाणी १९ नागरी मूलभूत सुविधा देखील उभारण्यात येणार आहेत.

Last Updated : Apr 5, 2022, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.