ETV Bharat / state

गोंदियात दुचाकी बसला धडकली; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Bus Accident sadak Arjuni

सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपासमोर दुचाकी बसला धडकली. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Two-wheeler bus accident Gondia
गोंदियात दुचाकीची बसला धडक
author img

By

Published : Dec 23, 2020, 7:14 PM IST

Updated : Dec 23, 2020, 9:38 PM IST

गोंदिया - सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपासमोर दुचाकी बसला धडकली. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रुपचंद गणिराम प्रधान (वय २६) व प्रदीप विजय औरासे (वय २४ रा. कुरखेडा, गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. तर, विनोद प्रधान (वय २६) असे गंभीर जख्मीचे नाव आहे.

घटनास्थळाचे दृष्य

हेही वाचा - जन्मदात्याने केली दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या, खामखुरा येथील घटना

तिघेही दुचाकीस्वार हे पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून निघाले असताना गोंदियाकडून येत असलेल्या गोंदिया-वडसा-चंद्रपूर (क्र. एम.एच ४० वाय ५२०८) या बसला दुचाकी (क्र. एमएच ३३ आर ८६४०) धडकली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील रुपचंद गणिराम प्रधान (वय २६) व प्रदीप विजय औरासे (वय २४ रा. कुरखेडा, गडचिरोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद प्रधान (वय २६) हा गंभीर जख्मी झाला. त्याला गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या अपघातात बसने पेट घेतला होता. मात्र, परिसरातील लोकांनी व पेट्रोल पंपावरील युवकांनी बसची आग विझवली, यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. डुगीपार पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले असून, गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा - गोंदिया नगरपरिषदेने ठोकले सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप, आतापर्यंत ७३ लाखाची कर वसुली

Last Updated : Dec 23, 2020, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.