गोंदिया - भरोसा सेलकडे २०२० च्या मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून आता पर्यंत कौटुंबिक वादाच्या ३७६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील काही तक्ररी भरोसा सेलने समुपदेशनातून सोडवल्या आहेत.
हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यातील 'या' गावाने कोरोनाला ठेवले दूर, दोनही लाटेत एकालाही कोरोनाची लागण नाही
१२५ तक्रारी भरोसा सेलने समुपदेशनातून निपटवल्या
२०२० च्या मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून ते डिसेंबर अखेरपर्यंत भरोसा सेलकडे २९१ कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १२५ तक्रारी भरोसा सेलने समुपदेशनातून निपटवल्या. मिळालेल्या तक्रारींमध्ये व्यसनाधीनता, प्रेम प्रकरण, सोशल मीडिया वापर, पती-पत्नी वाद हे मुद्दे होते. तसेच, उरलेल्या काही तक्रारींमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
२०२१ मध्ये पोलिसांना ८५ तक्रारी प्राप्त
२०२१ या नव्या वर्षापासून ते मे महिन्यापर्यंत पोलिसांना ८५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ३० तक्रारींमध्ये समुपदेश करण्यात आले आहे. जास्त व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक वाद होत आहे, महिलांवर अत्याचार होत आहे. तसेच, सोशल मीडियाचा वापर कमी केला तर कौटुंबिक वाद कमी होतील, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.
प्रबोधन घडवण्याची गरज
पोलीस विभाग, सामाजिक संस्था, मीडिया यांच्यावतीने जर नागरिकांमध्ये प्रबोधन घडवून आणले तर महिलांवरील हिंसाचार आणि कौटुंबिक वाद कमी होतील, असा विश्वास भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला.
हेही वाचा - गोंदियात महिला डॉक्टरचा विनयभंग, आरोपीवर विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल