ETV Bharat / state

अंगणवाडी सेविकेवर जडला वृद्धाचा जीव, तिने विरोध करताच डोक्यात घातली काठी - आंबेतलाव गाव

मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेची गावातील छगनलाल तुरकर या व्यक्तीने डोक्यात काठी मारुन हत्या केली आहे.

आरोपी आणि त्याचे पत्र
author img

By

Published : Apr 24, 2019, 8:34 PM IST

Updated : Apr 24, 2019, 10:15 PM IST

गोंदिया - मोहफूल वेचण्याकरता गेलेल्या डिलेश्वरी बघेले या अंगणवाडी सेविकेचा गावातील छगनलाल तुरकर (६४) या व्यक्तीने डोक्यात काठी मारुन हत्या केली आहे. आरोपीने या घटनेनंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव गावात ही घटना घडली.

घटनेबाबत माहिती देताना नागरिक

बघेले हे अंगणवाडीचे काम आटोपून दररोज प्रमाणे शेतात मोहफूल वेचण्याकरता गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा छगनलाल तुरकर (६४) हा त्यांचा पाठलाग करत शेतात आला. त्याने काठीने हल्ला करून बघेले यांची हत्या केली. यानंतर या आरोपीने काही अंतरावर जाऊन विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांना हा आरोपी बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी त्याच्या विरोधात ३०२ चा गुन्हा नोंद केला आहे. आरोपीने विष खाण्याअगोदर एका कागदावर 'मैं अभी नही बचूगा, मैं जहर खा लिया हू', असे लिहलेला कागद त्याच्याजवळ सापडला.

डिलेश्वरीच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तसेच मुलीचे लग्न झाले असून मुलगा नागपूर येथे एका कंपनीत काम करत आहे. डिलेश्वरी गावातीलच अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होती. आरोपी हा गावातीलच असून त्याची डिलेश्वरींवर वाईट नजर होती, अशी माहिती समोर येत आहे. आरोपीने महिलेशी असभ्य वागणूक करण्याचा प्रयत्न केला असावा आणि महिलेने याचा विरोध केल्यामुळे त्याने महिलेची हत्या केली असावी, असे बोलले जात आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 24-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-MH_24.GONDIA_.19_MUEDER OF ANGANWADI SAVKA
गोंदियात मोहफूल वेचण्या करिता गेलेल्या आगणवाडी सेविकेची ६४ वर्षीय आरोपीने केली हत्या
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील आंबेतलावगावात राहणाऱ्या डिलेश्वरी बघेले ह्या महिलेची मोहफूल वेचण्या करीत गेली असता महिलेच्या घरच्या बाजुला राहणारा ६४ वर्षीय इसमाने महिलेच्या डोक्यावर काठीने मारून हत्या केली व स्वतःने जहर खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
का सदर महिलेची एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. विशेष चार वर्षांपूर्वी मृतक महिलेसोबत गावातील 64 वर्षीय इसमाने तिची छेड काढली होती. या प्रकरणाची गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा करण्यात आली होती. त्याच व्यक्तीच्या हस्ताक्षराचे पत्र मृत्यूदेहजवळ आढळले.
VO :- डिलेश्वरी बघेले हे अंगणवाडीचे काम आटोपून दररोज प्रमाणे शेतात मोहफुल वेचण्याकरिता शेतात गेली असता महिलेच्या घरच्या बाजूला राहणार आरोपी छगनलाल तुरकर ६४ वर्षीय हा सुद्धा महिलेच्या पाठलाग करत शेतात गेला व महिलेची काठी हत्या केली व स्वतः ने काही अंतरावर जाऊन जहर खाऊन आत्महत्या करणाच्या प्रयत्न केला असून एका कागदावर मै भी नही बचुगा जहर खा लिया हू अश लिहलेला कागद मिळाला व काही अंतरावर आरोपी बेशुद्ध अवस्तेत मिळाला असल्याने त्याला गोंदिया येथील सामान्य रुग्नालयात भर्ती करण्यात आले असुन त्याच्यावर उपाचार सूर आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात ३०२ चा गुन्हा नोंद केला आहे.
VO :- डिलेश्वरीच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तसेच मुलीचे लग्न झाले असून मुलगा नागपूर येथे एक कंपनीत काम करीत आहे. डिलेश्वरी गावातीलच अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होती. आरोपी हा गावातीलच असून नेहमी तिच्यावर वाईट नजर ठेवत असायचा. नेहमी प्रमाणे अंगणवाडीतून आल्यानंतर मोहफुल वेचण्यासाठी गेल्याची माहिती आरोपीला होती आरोपीने महिलेचा पाठलाग करीत शेतात गेला. तिला एकटी पाहून तिच्याशी असभ्य वागणूक करण्याचा प्रयत्न केला. असावा व महिलेने याचा विरोध केला असल्यामुळे आरोपीने महिलेची हत्या केली असावा असे बोले जात आहे.
BYTE :- शशिकांत दसुरकर (पोलीस निरीक्षक)
BYTE :- मोहनलाल बारसागडे (तंटामुक्ती अध्यक्ष)
BYTE :- कुंजी सोनवणे (मृतक महिलेचा भाऊ )Body:VO:-Conclusion:
Last Updated : Apr 24, 2019, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.