ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी गोंदिया महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नवीन ठेकेदारांव्दारे जुन्या कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रयत्न, तसेच पैशांची मागणी इत्यादी तक्रारींविरुद्ध व मागण्यांसाठी गोंदिया महावितरण कार्यालयाच्या गेट समोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साखळी आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी महावितरण व ठेकेदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Gondia MSEDCL Office protest
कंत्राटी कर्मचारी आंदोलन गोंदिया
author img

By

Published : Jan 21, 2021, 3:17 PM IST

गोंदिया - नवीन ठेकेदारांव्दारे जुन्या कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रयत्न, तसेच पैशांची मागणी इत्यादी तक्रारींविरुद्ध व मागण्यांसाठी गोंदिया महावितरण कार्यालयाच्या गेट समोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साखळी आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी महावितरण व ठेकेदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत साखळी आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलन महारष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केले आहे.

माहिती देताना आंदोलनकर्ता

हेही वाचा - गोंदियात बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका एसीबीच्या जाळ्यात

आंदोलनात १०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलन कर्त्यांनी सांगितले की, मागील १५ वर्षापासून गोंदिया परिमंडळ महावितरण विभाग यंत्रचालक व तंत्रतज्ञ पदांवर १५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. असे सांगण्यात आले होते की, कोणत्याही ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचा ठेका दिला असेल तर जुन्या कर्मचाऱ्यांना घेणे आवश्यक राहील. परंतु, यावर्षी उर्मिला इलेक्ट्रिकल्स इंजिनियरींग या कंपनीला कर्मचारी ठेवण्याचा ठेका देण्यात आला. त्यांच्याकडून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, कामावर ठेवण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे.

उर्मिला इलेक्ट्रिकल इंजिनियरींगचा ठेका रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नवीन ठेकेदारांची नियुक्ती करताना एक अट ठेवण्यात यावी, की जुन्या कर्मचाऱ्यांना काढू नये. तसेच, थकीत मानधन देण्यात यावे. या मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

हेही वाचा - धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; अन्यथा, रस्त्यावर उतरू - भाजप महिला मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.