ETV Bharat / state

सात महिन्यानंतर अखेर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरु, पर्यटकांची गर्दी - गोंदिया जिल्हा बातमी

जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा आज सुरु करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा जंगलसफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ज्या पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी केली नाही, अशा पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला.

Navegaon Nagzira Tiger Project news
सात महिन्यानंतर अखेर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरु
author img

By

Published : Nov 1, 2020, 3:59 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा आज सुरु करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा जंगलसफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ऑफलाईन इंट्री न मिळाल्याने अनेक लोकांना परत जावे लागले. व्याघ्र प्रकल्पात खासगी वाहानांना बंदी असताना देखील अनेक वाहने प्रकल्पात जाताना दिसत आहेत.

सात महिन्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरु

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद होती. त्याचा परिणाम पर्यटन स्थळांवर रोजगार अवलंबून असलेल्या लोकांवर होत होता. मात्र आता हळूहळू राज्यातील पर्यटन स्थळे सुरू करायला सरकारने परवानगी दिली आहे. आजपासून गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. हा व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या जीपसी चालकांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्याच दिवशी नवेगाव नागझिरामध्ये पर्यटकांची गर्दी

व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्याचे समजताच पर्यटकांनी नागझिरामध्ये गर्दी केली, मात्र व्याघ्र प्रकल्प पाहाण्यासाठी पूर्व ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता असल्याने, ज्या पर्यटकांनी नोंदनी केली नाही त्यांना परत जावे लागले. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. तसेच खासगी वाहनांना या पर्यटन क्षेत्रात परवानगी नाही. मात्र पहिल्याच दिवशी सर्व नियम धाब्यावर बसवून खासगी वाहनांना प्रवेश देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.