गोंदिया : लहानपणात कुणी माती खातो तर कुणी चुना, खडू व राख. परंतू एका मुलीने चक्क केस खाल्ले ( Eating Hair )आहेत. यातही तिने एक, दोन किंवा पाच नाही तर तब्बल ५०० ग्रॅम केस ( half kg hair in 10 year gir stomach ) खाल्ले. यामुळे केस तिच्या पोटाच्या अन्न नलिकेच्या आतडीत अडकले. त्यामुळे तिला उलटी होऊन पोट दुखू लागले. तीन दिवस तिला त्रास झाला. त्यानंतर तिची तपासणी केल्यावर तिच्या पोटात चक्क केसांचा गोळा जमा असल्याचे कळले.
तीन दिवसापासून त्रास : गोंदिया येथील व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या दहा वर्षीय मुलीच्या पोटातून तो अर्धा किलो केसांचा गुच्छा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. तिरोडा तालुक्यातील १० वर्षीय मुलीला तीन दिवसापासून भुक न लागणे, पोट दुखणे, उलटी होणे हा त्रास होत होता. याकरिता तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोगतज्ञ डॉ. हितेश मंत्री यांना दाखविले. त्यांनी त्या मुलीची सोनोग्राफी केली. तेव्हा तिच्या पोटात काही वेगळी वस्तू असल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी तिला पुढील उपचाराकरीता गोंदिया येथील द्वारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. विभु शर्मा यांच्याकडे पाठवले.
शस्त्रक्रिये तीन दिवसापूर्वी पर्यंत केस खाल्ले : डॉ. शर्मा यांनी तिची तपासणी केली व वडीलांना सविस्तर विचारपूस केली. त्यांनी संगितले कि ती लहानपणी केस खायची. परंतू आता तिने केस खाणे बंद केले आहे. यावर डॉ. शर्मा यांनी मुलीला चारले असता. तीन दिवसापूर्वी पर्यंत केस खाल्ले असल्याचे तिना डॉक्टरांना सांगितले. तिच्या पोटाचे सिटीस्कॅन केले असता पोटात केसांचा गुच्छा असुन तो आतडयात गुंतलेला असल्याचे लक्षात ( eating hair intestines swelling ) आले. त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. शस्त्रक्रिया करताना मुलीच्या जीवला पण धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले.
केस खाणे एक मानसिक आजार : नातेवाईकांच्या संमतीने ही शस्त्रक्रिया डॉ. अविनाश येळणे, डॉ. यामिनी येळणे यांच्या मार्गदर्शनात डॉ. शर्मा यांनी डॉ. श्रध्दा शर्मा यांच्या मदतीने बधिरीकरणततज्ज्ञ डॉ. नरेश येरणे यांच्यासोबत तब्बल तीन तास शस्त्रक्रिया सुरू होती. अर्धा किलो केसांचा गुच्छा त्या मुलीच्या पोटातून काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती बरी आहे. शस्त्रक्रियेसाठी राहुल कावरे व नेहा खोब्रागडे यांनी सहकार्य केले. केस खाणे हा एक मानसिक आजार (eating Hair is a mental illness ) असून याचे प्रमाण फार कमी आहे. हा आजार क्वचितच आढळतो. त्या मुलीची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून या शस्त्रक्रियेला तीन तासाचा वेळ लागला आहे.