गोंदिया : जिल्ह्यात आमगाव येथे ८ ते १० फूट लांब व ४० किलो वजनाचा विशाल अजगर आढळून आला. नागरिकांनी तत्काळ याबाबत वनविभागाला कळवले. आमगाव वन विभाग आणि व गोंदिया निसर्ग मंडळाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत अजगराला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
आमगाव शहरातील यशवंत नगर येथे तेजराम उके यांच्या घरजवळ एक अजगरा चार उंदराचा शिकार करून झाडाला गुंडाळी मारलेल्या अवस्थेत आढळला. हा अजगर अंदाजे आठ फूट लांबीचा असून त्याचे वजन सुमारे चाळीस किलो असल्याची माहिती आहे. अजगराबाबत माहिती पसरताच लोकांनी घटनास्थळी गर्दी करायला सुरुवात केली. दरम्यान, आमगाव वन विभागाला कळवण्यात आले.
आमगाव वन विभाग व गोंदिया निसर्ग मंडळ माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अजगराला पकडण्यादरम्यान त्याने शिकार केलेले उंदीर तोंडातून बाहेर काढून त्याला पकडले. त्यानंतर, अजगराला आमगाव जावळी ठाणा येथील जंगलात परिसरात सोडून देण्यात आले. मात्र ह्या दरम्यान परिसरातील लोकांनी अजगर बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.