गोंदिया - नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी येथील पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सी-60 पथकामधील पोलीस कर्मचाऱ्याने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. २०११ साली तो पोलीस दलात सहभागी झाला होता. देवरी येथे तो भाड्याच्या घरात राहत असून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव ओमप्रकाश रहिले असे असून तो अर्जुनी-मोरगाव येथील रहिवासी आहे. ओमप्रकाशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस विभागात मोठी खबळ उडाली आहे. गोंदियाच्या नक्षलग्रस्त भागासाठी असलेल्या सी-60 पथकात तो कार्यरत होता.