गोंदिया - सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर गोंदियात अडकलेले होते. दरम्यान, आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंदियातून 577 नागरिकांना एस.टी. बसेमधून रवानगी करण्यात आली. यावेळी सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली असुन त्यांना सोबत जेवण, पाणी, मास्कची व्यवस्था करण्यात आली. तर या बसेस ज्या ठिकाणी जाणार आहेत त्याच ठिकाणी जाऊन थांबणार असून प्रवासादरम्यान कोठेही थांबणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकले आहेत. या काळात विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील 577 कामगार हे गोंदिया जिल्ह्यातच अडकून पडले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अडकलेल्या कामगार, विद्यार्थ्यांना संबंधित राज्यात पोहचविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कुंभारेनगरातून राज्यपरिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून 577 नागरिरांना सोडण्यात आले. यावेळी प्रवाशांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी लवकरच परराज्यात गोंदिया जिल्ह्यातील जे नागरिक अडकलेले त्यांना परत जिल्ह्यात आणणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - गोंदिया : वाहतुकीसाठी एसटी बसेस सॅनिटाईझ करून सज्ज, मात्र प्रशासनाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा