गोंदिया - गोंदियाची महाराणी म्हणून ओळख असलेली इंगळे चौकातील दुर्गा देवीला या वर्षी ५१ वर्ष पूर्ण होत आहेत. या ठिकाणी दुर्गा देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. तसेच या ठिकाणी या नऊ दिवसात विविध प्रकारचे कार्यक्रम व देवी जागरण महाआरती असंख्य दिव्याचे प्रज्वलनही केले जाते. महिलांच्या सक्षमीकरणापासुन तर लोकरंजनातुन जनजागृतीचे काम या उत्सवातुन केले जाते.
जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावाने दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे. या नऊ दिवसात गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी व देखावे बघण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच गोंदिया जिल्ह्यला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगड मधील हाजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या उत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांसाठी करण्यात येते.
हेही वाचा - गोंदियात 'या' एकाच ठिकाणी सर्व समाजातील स्त्रियांसाठी आयोजित होतो रास गरबा
या ठिकाणी महिला आधार संघटनेद्वारा महाराष्ट्र जोगवाचे नृत्यही देवी समोर सादर करण्यात आले. या नृत्यामध्ये सोनी मराठी नाट्य मधील कलाकार श्रुती केकतही सहभागी झाली. श्रुतीने सोनी मराठी या वाहिनीवर स्वराज्य जननी जिजा माता या मालिकेत शहाजी राजे यांच्या काकूचा पात्र करीत आहेत.
हेही वाचा - १५० वर्ष जुनी परंपरा आजही पाळताहेत खोडशिवनी गावातील नागरिक