ETV Bharat / state

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या १५ जणांना अटक; ७ पिकअप गाड्या जप्त

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत धापेवाडा येथील नाल्याजवळ सात वाहनामध्ये एकूण ३७ जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असल्याची आढळून आले. जनावरांसह ५० लाखाच्या जवळपास मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असून १५ आरोपींना अटक करण्यात आले. ही कारवाई काल रात्रीच्या दरम्यान करण्यात आली.

गोंदिया
गोंदिया
author img

By

Published : Nov 27, 2020, 8:07 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आजही जनावरांची अवैधरित्या कत्तलीसाठी विक्री होत आहे. जनावरांना वाहनात कोंबून राज्यात व परराज्यात कत्तलीसाठी नेत असल्याचे प्रकार सुरूच आहेत. अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी आजही हा व्यवसाय जोमात सुरू आहे.

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या १५ जणांना अटक

चंगेरा येथून नागपूरला अवैधरित्या जनावरांना वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने तिरोडा तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत धापेवाडा येथील नाल्याजवळ सात वाहनामध्ये एकूण ३७ जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असल्याची आढळून आले. जनावरांसह ५० लाखाच्या जवळपास मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असून १५ आरोपींना अटक करण्यात आले. ही कारवाई काल रात्रीच्या दरम्यान करण्यात आली.

१५ आरोपींना अटक केले

स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही करत बोलेरो पिकअप वाहनासह एकूण ७ वाहनांमध्ये ३७ जनावरे व १५ आरोपींना अटक केले असून छापा टाकून हे वाहन ताब्यात घेतले व जनावरांची सुटका करून एकूण ४९ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी रविशंकर बिजेवार, अजहर कलाम बेग, किसान कावरे, अनिल उके, मजहर बेग, मुस्ताक खान, शकील शावंत, दिलीप रंगारी, खेमराज टेकाम, अशोक बागडे, सोहेम बेग, शिवराम हिरवानी, एजाज खान, तोफीक तालीन, जयराम हिरवानी यांना ताब्यात घेऊन यांच्या विरुध्द प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१) ड ई फ ह सहकलम ५ अ २ ९ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम २०१५, सह कलम १०९भादंवि अन्वेय गुन्हा नोंद केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.