ETV Bharat / state

दारूबंदीसाठी गडचिरोलीच्या महिलांचे 'बाजा बाजाओ' आंदोलन - गडचिरोली दारूबंदी

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे धानोरा तालुक्यातील मुरूमगाव आणि हिरंगे गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या गावातील दारूविक्री बंद केली आहे. ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी महिला सातत्याने प्रयत्न करत आहे. पण काहीच अंतरावर असलेल्या कुलभट्टी या गावात अनेक जण दारू गाळून त्याची विक्री करतात. त्यामुळे या दोन्ही गावातील पुरुष दारू पिण्यासाठी कुलभट्टी या गावी येतात.

agitation
agitation
author img

By

Published : Jun 15, 2020, 5:50 PM IST

गडचिरोली - धानोरा तालुक्यातील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी 'बाजा बजाओ' आंदोलन केले. कुलभट्टी गावातील दारूविक्रीमुळे त्रस्त असलेल्या मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी हे अनोखे आंदोलन केले. महिलांच्या या आंदोलनाने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे धानोरा तालुक्यातील मुरूमगाव आणि हिरंगे गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या गावातील दारूविक्री बंद केली आहे. ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी महिला सातत्याने प्रयत्न करत आहे. पण काहीच अंतरावर असलेल्या कुलभट्टी या गावात अनेक जण दारू गाळून त्याची विक्री करतात. त्यामुळे या दोन्ही गावातील पुरुष दारू पिण्यासाठी कुलभट्टी या गावी येतात. परिणामी हे गाव दोन्ही गावासाठी डोकेदुखी बनले आहे. येथून दारू पिऊन मुरूमगावला परतताना आतापर्यंत अनेकांचे अपघात झाले आहे.

दारूबंदीसाठी गडचिरोलीच्या महिलांचे 'बाजा बाजाओ' आंदोलन

हा प्रकार थांबण्यासाठी मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी कुलभट्टी येथे दारूविक्रेत्यांविरोधात 'बाजा बाजाओ' आंदोलन छेडले. संपूर्ण गावातून बँड वाजवत कुलभट्टीवासीयांनो जागे व्हा, दारू विक्री बंद करा, 'नही चलेगी नही चलेगी, गाव मे दारू नही चलेगी' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या गावातील दारूविक्रीमुळे इतर गावातील दारूबंदीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे येथील दारू गाळणे व विक्री बंद करण्याचे आवाहन या आंदोलनकर्त्या महिलांनी नागरिकांना केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.