ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; गडचिरोली शहरानजीकची घटना

सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गडचिरोली शहराजवळ घडली.

tiger attack
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Dec 16, 2020, 8:05 PM IST

गडचिरोली - सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गडचिरोली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर चांदाळा मार्गावर बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. सुधा अशोक चिलमवार (वय -58 रा. इंदिरानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

ओरडण्यामुळे इतर महिलांचा वाचला जीव-

बुधवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरातील काही महिला सरपण गोळा करण्यासाठी चांदाळा मार्गावरील बिट क्रमांक 174 मध्ये गेल्या होत्या. सरपण गोळा करीत असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुधा चिलमवार यांच्यावर हल्ला चढवला. तेव्हा सोबतच्या महिलांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत वाघाने सुधा यांना ठार केले होते. महिलांच्या ओरडण्यावरून वाघ घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

वाघाचा वावर असल्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष-

गडचिरोली शहरालगत चामोर्शि मार्गावरील सेमाना परिसरात तसेच चांदाळा महामार्गावर झुडपी जंगल आहे. या जंगलामध्ये वाघाचा वावर असल्याच्या सूचना वन विभागाने यापूर्वीच दिल्या आहेत. अनेक ठिकाणी फलक लावून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यानंतरही काही महिला सरपन गोळा करण्यासाठी जंगलात जातात. त्यामुळेच ही घटना घडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.