ETV Bharat / state

आदिवासी समाजाचा पायंडा : गाव संघटनेच्या पुढाकाराने दारूविना पार पडली ८ लग्न

गोंड समाजात लग्नाच्या काही दिवस आधी समाजातील लोकांची एक सभा घेतली जाते. लग्नासारख्या शुभ कार्यात दारूमुळे होणारी भांडणे लोकांसाठी नवीन नव्हती. त्यामुळे दारूचा विरोध असलेल्या ओमप्रकाश कल्लो याने त्याच्याच लग्नासाठी घरी भरलेल्या सभेत लग्नात कोणत्याही कार्यक्रमात दारूचा वापर करायचा नाही, अशी अट घातली. समाजानेही त्याला दुजोरा दिला आणि हे संपूर्ण लग्न दारूमुक्त झाले.

दारूमुक्त लग्न
author img

By

Published : Jun 4, 2019, 2:40 PM IST

गडचिरोली - कोरची तालुक्यातील ६ गावांमध्ये मुक्तिपथ गाव संघटन आणि युवकांच्या पुढाकाराने तब्बल आठ लग्न दारू विना पारपडली आहेत. या लग्नांमध्ये प्रथा, परंपरा तसेच करमणुकीच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचे मद्यप्राशन झाले नाही. दारूचा वापर न केल्याने ही सर्व लग्न आनंददायी ठरली.

जिल्ह्यातील कोरची हा आदिवासी बहुल तालुका आहे. आदिवासी समाजामध्ये लग्न, देवपूजा आणि इतरही आनंदाच्या प्रसंगात दारूचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी दारू पिऊन शिवीगाळ, मारामारी, असे प्रकारही नेहमीच घडतात. ही बाब टाळून लग्न आनंददायी व्हावे यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे पुढाकार घेण्यात आला. सातपुती गावात दारूबंदीचा ठराव असतानाही लपून छपून दारूची विक्री होते. मात्र, याच गावातील युवकांनी दारूमुक्त लग्नासाठी विशेष परिश्रम घेतले.

गोंड समाजात लग्नाच्या काही दिवस आधी समाजातील लोकांची एक सभा घेतली जाते. लग्नासारख्या शुभ कार्यात दारूमुळे होणारी भांडणे लोकांसाठी नवीन नव्हती. त्यामुळे दारूचा विरोध असलेल्या ओमप्रकाश कल्लो याने त्याच्याच लग्नासाठी घरी भरलेल्या सभेत लग्नात कोणत्याही कार्यक्रमात दारूचा वापर करायचा नाही, अशी अट घातली. समाजानेही त्याला दुजोरा दिला आणि हे संपूर्ण लग्न दारूमुक्त झाले.

गावातील अशोक नुरुटी, दशरथ नुरुटी यांची लग्न दारूमुक्त झाली. विनंता नुरुटी या मुलीनेही आपले लग्न दारूमुक्त व्हावे, असा प्रस्ताव घरी मांडला आणि त्या मुलीचे लग्नही दारूमुक्त झाले. अशाच प्रकारचा पुढाकार गहानेगाठा येथील अनिल पोरेटी, साल्हे येथील ललिता काटेंगे, बोडेना येथील मडावी या कुटुंबीयांनी घेतला. या निर्णयामुळे लग्नांमध्ये कोणत्याही कार्यात दारूचा वापर झाला नाही. मुक्तिपथ गाव संघटनेसह सर्व ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य केले. आदिवासी समाजात होत असलेली लग्न नव्या बदलाचे संकेत देत आहेत. इतरही गावांतील युवक-युवती आणि त्यांचे कुटुंबीय दारूविना लग्न होण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

Intro:अनोखा पायंडा : गाव संघटनेच्या पुढाकाराने आठ लग्न झाली दारूमुक्त

गडचिरोली : कोरची तालुक्यातील ६ गावांमध्ये मुक्तिपथ गाव संघटन आणि युवकांच्या पुढाकाराने तब्बल आठ लग्न दारूमुक्त झाली. या लग्नांमध्ये प्रथा, परंपरा किंवा एन्जॉयमेंटच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचे मद्यप्राशन झाले नाही. दारूचा वापर न केल्याने ही सर्व लग्न आनंददायी ठरली. Body:गडचिरोली जिल्ह्यातील कोरची हा आदिवासी बहुल तालुका. आदिवासी समाजामध्ये लग्न, देवपूजा व इतरही आनंदाच्या प्रसंगात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी दारू पिऊन शिवीगाळ, मारामारी असे प्रकारही नेहमीच घडतात. ही बाब टाळून लग्न आनंददायी व्हावे यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांद्वारे पुढाकार घेण्यात आला. सातपुती गावातील युवकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

गोंड समाजात लग्नाच्या काही दिवस आधी समाजातील लोकांची एक सभा घेतली जाते. सातपुती गावात दारूबंदीचा ठराव असतानाही लपून छपून दारूची विक्री होते. लग्नासारख्या शुभ कार्यात दारूमुळे होणारी भांडणे लोकांसाठी नवीन नव्हती. त्यामुळे दारूचा विरोध असलेल्या ओमप्रकाश कल्लो याने त्याच्याच लग्नासाठी घरी भरलेल्या सभेत लग्नात कोणत्याही कार्यक्रमात दारूचा वापर करायचा नाही, अशी अट घटली. समाजानेच याला दुजोरा दिला आणि हे संपूर्ण लग्न दारूमुक्त राहिले.

याच प्रकारे गावातील अशोक नुरुटी, दशरथ नुरुटी यांची लग्न दारूमुक्त झाली. विनंता नुरुटी या मुलीनेही आपले लग्न दारूमुक्त व्हावे, असा प्रस्ताव घरी मांडला आणि त्या मुलीचे लग्नही दारूमुक्त झाले. अशाच प्रकारचा पुढाकार गहानेगाठा येथील अनिल पोरेटी, साल्हे येथील ललिता काटेंगे, बोडेना येथील मडावी या परिवारांनी घेतला. या निर्णयामुळे लग्नांमध्ये कोणत्याही कार्यात दारूचा वापर झाला नाही. मुक्तिपथ गाव संघटनेसह सर्व ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य केले. आदिवासी समाजात होत असलेली लग्न नव्या बदलाचे संकेत देत आहेत. इतरही गावांतील युवक-युवती आणि त्यांचे परिवार लग्न दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेत आहेत. 
Conclusion:सोबत फोटो आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.