ETV Bharat / state

'शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही' - गडचिरोली चकमक वडेट्टीवार

शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांवर या घटनेचा मोठा आघात झाला आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी असून शहिदांच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत दिली जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईहून दुरध्वनीद्वारे या घटनेबाबत शोकसंदेश प्रशासनाला दिला.

'शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही'

author img

By

Published : May 17, 2020, 9:55 PM IST

Updated : May 17, 2020, 10:35 PM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयरकोटी-कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली वाहिली. हुतात्मा झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (वय 29) व पोलीस शिपाई किशोर आत्राम (वय 30) यांचा समावेश आहे.

'शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही'

धनाजी होनमाने यांना नुकतेच नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेत एक जवानही जखमी झाला आहे. जखमी पोलीस जवानावर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पालकमंत्र्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे ते म्हणाले. शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांवर या घटनेचा मोठा आघात झाला आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी असून शहिदांच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत दिली जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईहून दुरध्वनीद्वारे या घटनेबाबत शोकसंदेश प्रशासनाला दिला. ते बैठकीसाठी मुंबई येथे पोहचले असताना त्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेऊन तातडीने पोलीस प्रशासनाला संबंधित जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याबाबत विनंती केली. या घटनेची चौकशी करण्याबाबतही वरिष्ठ पोलीस यंत्रणेशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : May 17, 2020, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.