ETV Bharat / state

गडचिरोलीत पोलीस चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार; दोघांवरही होते 8 लाखांचे बक्षीस

author img

By

Published : Apr 28, 2021, 10:03 PM IST

एटापल्ली तालुक्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या जांबिया गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाले.

two-naxalites-killed-in-gadchiroli
two-naxalites-killed-in-gadchiroli

गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या जांबिया गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान अभियान राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत विनय लालू नरोटे (32) रा. झरेवाडा ता. एटापल्ली आणि विवेक उर्फ सुरज कानू नरोटे रा. झाडेटोला ता. धानोरा हे दोन जहाल नक्षलवादी ठार झाले. दोघांवरही विविध पोलिस ठाण्यात खून, जाळपोळ असे विविध गुन्हे दाखल असल्याने शासनाने त्यांच्यावर हात लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जवानांचा दबाव वाढल्याने नक्षलवादी प्रसार -

सी-60 जवान सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे अभियान राबवत होते. तेव्हा जंगलात दबा धरून बसलेला 20 ते 25 नक्षलवाद्यांनी सी-60 जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. जवानांनी घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन राबवले असता दोन जहाल पुरुष नक्षलवादी मृत अवस्थेत आढळून आले.

गडचिरोलीत पोलीस चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार
दोघांवरही होते 15 हून अधिक गुन्हे दाखल -

१) विनय लालु नरोटे (३१ वर्षे, रा. झारेवाडा ता. एटापल्ली) हा नक्षलवाद्यांच्या एलओएसमध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर शस्त्र बाळगणे, खून, जाळपोळ, चकमक असे १६ गुन्हे दाखल होते.

२) विवेक उर्फ सुरज उर्फ मनोहर नरोटे (रा. झाडाटोला ता. धानोरा) हा भामरागड एलओएसमध्ये एसीएम या पदावर कार्यरत होता. त्यावर शस्त्र कायदा, खून, चकमक व इतर असे १८ गुन्हे दाखल होते. यामध्ये २०२० साली कोठी येथे शहीद झालेले पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांच्या हत्येत विवेकचा सहभाग होता. तसेच कोठी येथे पोलीस खबरी असल्याच्या कारणावरून विनोद मडावी, पुरसलगोंदी येथील अशोक पुरसामी व बुर्गी येथील उपसरपंच रामा तलांडी या सर्वांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. तर २१ एप्रिल रोजी गट्टा पोलीस मदत केंद्रावर गोळीबार करण्यात विनय नरोटे व विवेक नरोटे यांचा प्रमुख सहभाग होता. शासनाने विनय नरोटे याचेवर ०२ लाखाचे बक्षीस तर विवेक नरोटे याचेचर ६ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले
होते.

आणखी नक्षलवादी जखमी असल्याचा अंदाज -

चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावर एक ९ एमएम पिस्टन, एक भरमार, स्फोटक साहित्ये तसेच नक्षलवादांच्या दैनदिनी वापराचे साहित्य मोठया प्रमाणावर जप्त करण्यात आले. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.