गडचिरोली- कुरखेटा तालुक्यातील कढोली येथून ग्रामस्थ ट्रॅक्टर ट्रालीवर बसून गांगोली गावाला कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी दुपारच्या सुमारास करखेड्याकडे जाणाऱ्या ट्रकला ट्रॅक्टर ट्रालीची जोरदार धडक बसली. हा अपघात कढोली ते गांगूली दरम्यान झाला. अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून इतर ९ जण जखमी झाले आहेत. सुलोचना गिरीधर ठाकरे (वय. ६५) असे मृत महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - कुरखेडा स्फोटामागचा मास्टरमाईंड नक्षली दिनकर गोटाला अटक; 15 जवानांना गमवावे लागले होते प्राण
जखमींमध्ये टिकाराम सीताराम ठाकरे (वय.७०), वच्छला राऊत (वय.६०) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. नैना धनराज ठेगंरी (वय.४६), सत्यभामा ठेगंरी (वय.६५), धर्मा ठाकरे (वय.७०), अनिकेत ठाकरे (वय.१८) प्रतिभा ठाकरे (वय.४५), प्रणाली ठाकरे (वय.१६), प्रतिक ठाकरे (वय.१२) यांना उपजिल्हा रुग्णालय कूरखेडा येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत व जखमी हे कढोली येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा - गडचिरोलीत टिप्पर-ऑटोचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
ट्रकची धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरवरील स्वार दूरवर फेकला गेला. घटनेची माहिती मीळताच गावकऱ्यानी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमींना मदत करत उपचाराकरता रवाना केले. कूरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठत ट्रॅक्टरमध्ये फसलेल्या मृत महिलेला बाहेर काढले व घटनेचा पंचनामा केला.