ETV Bharat / state

गडचिरोली-चिमूर : ओबीसी समाजाची नाराजी भाजपसाठी तर अंतर्गत गटबाजी काँग्रेससाठी ठरणार डोकेदुखी - election

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती  दिली होती.

भाजपचे अशोक नेते Vs काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी
author img

By

Published : Mar 28, 2019, 12:32 PM IST

Updated : Mar 28, 2019, 3:47 PM IST

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, आगामी निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी सोपी नाही. भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तर, काँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, डॉ. उसेंडी यांच्यासमोर पक्षातील अंतर्गत गटबाजी संपवण्याचे मोठे आवाहन आहे.

भाजपचे अशोक नेते Vs काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी

राज्यात अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. विस्तीर्ण अशा असलेल्या या मतदारसंघात आजही रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. सोबतच सिंचन, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून मतदारांमध्ये रोष आहे. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिली होती.

२००९ ला मतदारसंघांची पुनर्रचना झाली. तेव्हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.

मतदार संघातील सद्याची राजकीय परिस्थिती

२००९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून दोन निवडणुका झाल्या. २००९ ला काँग्रेसचे मारोतराव कोवासे तर २०१४ला भाजपचे अशोक नेते या मतदारसंघातून निवडून आले. यापूर्वी गडचिरोली-चंद्रपूर, असा लोकसभा मतदारसंघ होता. तर चिमूर हा वेगळा लोकसभा मतदारसंघ होता. गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे हंसराज अहीर तर चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसची सत्ता होती. चिमूर मतदारसंघातूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार हे तीनदा निवडून आले होते. तर याच जागेवरून १९९९ व २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नामदेव दिवटे व महादेवराव शिवणकर निवडून आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांचा पराभव करीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे या मतदार संघातून निवडून आले होते.

भाजपकडून २०१४ निवडणूकांवेळी देण्यात आलेले एकही आश्वासन नेतेंनी पूर्ण केले नाही, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे. मात्र लोकसभा क्षेत्रातल्या नगर पालिका, नगर पंचायती व जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता असणे खासदार नेतेंसाठी जमेची बाजू आहे.

२०१४ लोकसभा निवडणूक

२०१४ च्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव करून भाजपचे अशोक नेते मोदी लाटेत विजयी ठरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यावेळीही ते प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात असून चेहरे जुनेच मात्र रणनीती नवी दिसणार आहे. विद्यमान खासदार अशोक नेते आरमोरी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र वगळता इतर कोणत्याही विधानसभा क्षेत्रांमध्ये फिरकले नसल्याचे मतदार सांगतात. तर नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवताना मतदारांशी जनसंपर्क कायम ठेवला.

अशोक नेते (भाजप) - ५ लाख ३५ हजार ९८२

डॉ.नामदेव उसेंडी (काँग्रेस) - २ लाख ९९ हजार ११२

स्थानिकांचे प्रश्न -

या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रेंगाळले असून चिचडोह बॅरेज वगळता एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. तर आरोग्याची समस्याही तेवढीच बिकट असून रस्त्यांअभावी अनेकांना रुग्णालयात पोहोचता पोहोचता जीव गमवावा लागला आहे, अशा घटना अनेकदा घडल्या. तर उच्च शिक्षणाची सुविधा ही गडचिरोली वगळता कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे येथील युवक बारावीनंतर नागपूर, पुणे येथे जाऊन शिक्षण घेतात. तर बेरोजगारीचा प्रश्नही बिकट असून जिल्ह्यातील एकमेव सुरजागड लोह प्रकल्पचे काम सुरू झाले. मात्र येथील उत्खनन करून प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक युवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण १९ टक्क्याहून ६ टक्के झाले. त्यामुळे येथील ओबीसी समाज बांधव आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सर्व समस्या मतदारांना भेडसावत आहेत.

लोकसभा मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती -

या क्षेत्रात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्या तरी मोठे सिंचन प्रकल्प नाही. मराठी, हिंदी, गोंड, माडिया व तेलुगु भाषा या क्षेत्रात प्रचलित आहे. हा भाग विदर्भ, छत्तीसगडसह तेलंगणाचा संस्कृती संगम आहे. विदर्भाची काशी असलेल्या श्री श्रेत्र मार्कंडादेव, चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक मुद्दे आहेत. मात्र सामान्य माणसांना नक्षलवाद्यांच्या बंदुकीचा धाक आणि शासनाच्या न पोहोचलेल्या योजनांमुळे हा क्षेत्र आजही मागास आहे.

मतदारांची संख्या

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ४१ हजार ६३० नव्या मतदारांची भर पडली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांमध्ये ७ लाख ९४ हजार ७६८ पुरुष तर ७ लाख ७३ हजार ८५० महिला असे १५ लाख ६८ हजार ६२० मतदार आहेत. या मतदारसंघात १ लाख ३० हजार ४९३ शहरी मतदार तर १० लाख १ हजार १४१ ग्रामीण मतदार आहेत. या मतदार क्षेत्रात १ हजार ८७१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. हा अतिसंवेदनशील मतदार संघ असल्याने गडचिरोली, आरमोरी, अहेरी व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत तर चिमूर व ब्रह्मपुरी या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.

Intro:Body:

tough fight between bjp and congress in  gadchiroli chimur constituency

गडचिरोली-चिमूर : ओबीसी समाजाची नाराजी भाजपसाठी तर अंतर्गत गटबाजी काँग्रेसाठी ठरणार डोकेदुखी

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, आगामी निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी सोपी नाही. भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तर, काँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, डॉ. उसेंडी यांच्यासमोर पक्षातील अंतर्गत गटबाजी संपवण्याचे मोठे आवाहन आहे.

राज्यात अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. विस्तीर्ण अशा असलेल्या या मतदारसंघात आजही रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. सोबतच सिंचन, बेरोजगारीच्या प्रश्नांवरून मतदारांमध्ये रोष आहे. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती  दिली होती.

२००९ ला मतदारसंघांची पुनर्रचना झाली. तेव्हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.  

मतदार संघातील सद्याची राजकीय परिस्थिती -

२००९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून दोन निवडणुका झाल्या. २००९ ला काँग्रेसचे मारोतराव कोवासे तर २०१४ला भाजपचे अशोक नेते या मतदारसंघातून निवडून आले. यापूर्वी गडचिरोली-चंद्रपूर, असा लोकसभा मतदारसंघ होता. तर चिमूर हा वेगळा लोकसभा मतदारसंघ होता. गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे हंसराज अहीर तर चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसची सत्ता होती. चिमूर मतदारसंघातूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार हे तीनदा निवडून आले होते. तर याच जागेवरून १९९९ व २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नामदेव दिवटे व महादेवराव शिवणकर निवडून आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांचा पराभव करीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे या मतदार संघातून निवडून आले होते.

भाजपकडून २०१४ निवडणूकांवेळी देण्यात आलेले एकही आश्वासन नेतेंनी पूर्ण केले नाही, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे. मात्र लोकसभा क्षेत्रातल्या नगर पालिका, नगर पंचायती व जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता असणे खासदार नेतेंसाठी जमेची बाजू आहे.

२०१४ लोकसभा निवडणूक -

२०१४ च्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव करून भाजपचे अशोक नेते मोदी लाटेत विजयी ठरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यावेळीही ते प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात असून चेहरे जुनेच मात्र रणनीती नवी दिसणार आहे. विद्यमान खासदार अशोक नेते आरमोरी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र वगळता इतर कोणत्याही विधानसभा क्षेत्रांमध्ये फिरकले नसल्याचे मतदार सांगतात. तर नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवताना मतदारांशी जनसंपर्क कायम ठेवला.

अशोक नेते (भाजप) - ५ लाख ३५ हजार ९८२

डॉ.नामदेव उसेंडी (काँग्रेस) - २ लाख ९९ हजार ११२

स्थानिकांचे प्रश्न -

या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रेंगाळले असून चिचडोह बॅरेज वगळता एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. तर आरोग्याची समस्याही तेवढीच बिकट असून रस्त्यांअभावी अनेकांना रुग्णालयात पोहोचता पोहोचता जीव गमवावा लागला आहे, अशा घटना अनेकदा घडल्या. तर उच्च शिक्षणाची सुविधा ही गडचिरोली वगळता कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे येथील युवक बारावीनंतर नागपूर, पुणे येथे जाऊन शिक्षण घेतात. तर बेरोजगारीचा प्रश्नही बिकट असून जिल्ह्यातील एकमेव सुरजागड लोह प्रकल्पचे काम सुरू झाले. मात्र येथील उत्खनन करून प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक युवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण १९ टक्क्याहून ६ टक्के झाले. त्यामुळे येथील ओबीसी समाज बांधव आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सर्व समस्या मतदारांना भेडसावत आहेत.

लोकसभा मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती -

२००९ ला मतदारसंघांची पुनर्रचना झाली. तेव्हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.  

या क्षेत्रात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्या तरी मोठे सिंचन प्रकल्प नाही. मराठी, हिंदी, गोंड, माडिया व तेलुगु भाषा या क्षेत्रात प्रचलित आहे. हा भाग विदर्भ, छत्तीसगडसह तेलंगणाचा संस्कृती संगम आहे. विदर्भाची काशी असलेल्या श्री श्रेत्र मार्कंडादेव, चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक मुद्दे आहेत. मात्र सामान्य माणसांना नक्षलवाद्यांच्या बंदुकीचा धाक आणि शासनाच्या न पोहोचलेल्या योजनांमुळे हा क्षेत्र आजही मागास आहे.

मतदारांची संख्या -

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ४१ हजार ६३० नव्या मतदारांची भर पडली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांमध्ये ७ लाख ९४ हजार ७६८ पुरुष तर ७ लाख ७३ हजार ८५० महिला असे १५ लाख ६८ हजार ६२० मतदार आहेत. या मतदारसंघात १ लाख ३० हजार ४९३ शहरी मतदार तर १० लाख १ हजार १४१ ग्रामीण मतदार आहेत. या मतदार क्षेत्रात १ हजार ८७१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. हा अतिसंवेदनशील मतदार संघ असल्याने गडचिरोली, आरमोरी, अहेरी व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत तर चिमूर व ब्रह्मपुरी या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 28, 2019, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.