ETV Bharat / state

Naxalites Killed in Gadchiroli : गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन नक्षलवादी ठार

author img

By

Published : Apr 30, 2023, 9:50 PM IST

Updated : Apr 30, 2023, 10:48 PM IST

गडचिरोलीमधील अहेरी भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या नक्षलवाद्यांवर तब्बल 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

Etv Bharat
Etv Bharat

गडचिरोली - अहेरी तहसीलमधील मान्ने राजाराम येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 38 लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती डीआयजी संदिप पाटील यांनी दिली आहे.

तीन नक्षलवादी ठार - गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या चकमकीत पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्या साईनाथचा खून करणारा पेरमिली दलम कमांडर बिठलु मडावी यालाही ठार करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांनी दिली माहिती - भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम जंगलात रविवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. गडचिरोली पोलिसांचे सी-60 जवान मन्नेराजाराम जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तीन पुरुष नक्षलींना ठार करण्यात आले आहे. एकाची ओळख पटली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. महाराष्ट्र दिनाच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्षलवाद्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

पोलिसांवर केला गोळीबार - गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, पोलिसांना माहिती मिळाली होती की नक्षलवाद्यांच्या पेरिमिली आणि अहेरी दलमचे सदस्य माने राजाराम आणि पेरिमिली सशस्त्र चौकी दरम्यानच्या जंगलात तळ ठोकून होते. या गुप्त माहितीच्या आधारे सी.60 च्या दोन तुकड्या प्राणहिता येथून जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. शोध मोहिमेदरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. गोळीबारानंतर घटनास्थळावरून तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह, शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

27 एप्रिलला झाला होता मोठा हल्ला : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात 11 DRG जवान शहीद झाले होते. या घटनेत एका चालकाचाही मृत्यू झाला होता. बुधवार 27 एप्रिल रोजी झालेल्या या नक्षलवादी हल्ला करण्यात आला होता. नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात काँक्रीटचा रस्त्याला मोठ्ठा खड्डा देखील पडला होता. जवानांची गाडी अरणपूर पोलीस स्टेशन परिसरात येताच नक्षलवाद्यांनी ती उडवून दिली. या IED स्फोटात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.

मिशनवरून परतणाऱ्या जवानांवर हल्ला : मिळालेल्या माहितीनुसार, मिशनवरून परतणाऱ्या जवानांवर हल्ला नक्सलवाद्यांनी हल्ला केला होता. दंतेवाडा परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यामुळे डीआरजी टीम शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आली. शोध मोहीम पूर्ण करून पथक परतत असताना नक्षलवाद्यांनी परतीच्या वाटेवर आयईडीचा स्फोट घडवला होता. या हल्ल्यात 1 चालकासह 10 जवान शहीद झाले होते.

हेही वाचा - Building Collapsed in Bhiwandi : भिवंडी इमारत दुर्घटना; इमारत मालकाला अटक

Last Updated : Apr 30, 2023, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.