ETV Bharat / state

गडचिरोलीत वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उलटली; 3 ठार, 12 जखमी - पिकअप

भिवापूरजवळच्या कालव्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले

पिकअप उलटले
author img

By

Published : Apr 19, 2019, 12:09 PM IST

गडचिरोली - लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने ३ जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चामोर्शी तालुक्यातील भिवापूरजवळच्या कालव्याजवळ घडली.

मुकुंदा दिवाकर वासेकर (रा. सिमतळा, ता. मूल, जि. चंद्रपूरः, तुळशीराम शिवा बुरांडे (वय ६७) व सुषमा बुरांडे ( वय ३५) (रा. इटोली, ता. बल्लारपूर, जि.चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

इटोली (मानोरा) जिल्हा चंद्रपूर येथील लग्नाचे वऱ्हाड एमएच ३४ बीजी ०५८५ क्रमांकाच्या पिकअप वाहनाने चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथे आले होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाड घेऊन पिकअप वाहन किटोलीकडे जाण्यास निघाले. या वाहनात १७ ते १८ जण बसले होते. मात्र, दोन किलोमीटर पुढे जाताच भिवापूरजवळच्या कालव्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात ३ जण ठार, ६ गंभीर तर ६ जण किरकोळ जखमी झाले.

पार्वता देवतळे, भगवती दुधबळे, राजू पिपरे, शामसुंदर देवतळे, सावित्रीबाई वासेकर, बापूजी देवतळे, ताराबाई देवतळे, संगीता देवतळे, रामदास पिपरे, बापूजी देवतळे, माधुरी वासेकर, विमल चलाख, आनंदाबाई वासेकर अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Intro:वर्हाड घेऊन जाणारे वाहन उलटले ; 3 ठार, 12 जखमी

गडचिरोली : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने तीन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकच्या कालव्याजवळ घडली. मुकुंदा दिवाकर वासेकर (३२) रा.सिमतळा, ता. मूल, जि.चंद्रपूर, तुळशीराम शिवा बुरांडे (६७) व सुषमा बुरांडे (३५) दोघेही रा. इटोली, ता. बल्लारपूर, जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.
Body:इटोली (मानोरा) जिल्हा चंद्रपूर येथील लग्नाचे वऱ्हाड एमएच ३४ बीजी ०५८५ क्रमांकाच्या पीकअप वाहनाने चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथे आले होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाड घेऊन पिकअप वाहन किटोलीकडे जाण्यास निघाले. या वाहनात १७ ते १८ जण बसले होते. मात्र, दोन किलोमीटर पुढे जाताच भिवापूरनजीकच्या कालव्याच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यात तीन जण ठार, ६ गंभीर, तर ६ जण किरकोळ जखमी झाले.

पार्वता देवतळे, भगवती दुधबळे, राजू पिपरे, शामसुंदर देवतळे, सावित्रीबाई वासेकर, बापूजी देवतळे, ताराबाई देवतळे, संगीता देवतळे, रामदास पिपरे, बापूजी देवतळे, माधुरी वासेकर, विमल चलाख, आनंदाबाई वासेकर अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आणि फोटो आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.