ETV Bharat / state

कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू - electric shock

रमेश लक्ष्‍मण आत्राम रा. मुलचेरा (वय ३० वर्ष) आणि दौलत बच्चा मडावी रा. मुलचेरा (वय ४३वर्ष) असे मृतांची नावे आहेत.

दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 21, 2019, 10:17 PM IST

Updated : Mar 21, 2019, 11:25 PM IST

गडचिरोली - शेतात लावण्यात आलेल्या विजेच्या कुंपणाचा शॉक लागून दोन आदिवासी नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपूरमध्ये हा प्रकार घडला. रमेश लक्ष्‍मण आत्राम (रा. मुलचेरा, वय ३० वर्ष) आणि दौलत बच्चा मडावी (रा. मुलचेरा, वय ४३वर्ष) असे मृतांची नावे आहेत.

मुलचेरा तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय लगत असलेल्या विवेकानंदपूर हद्दीतील आणि गट्टा मार्गावर मका शेती आहे. पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शेतात विजेचा प्रवाह सोडला होता. या तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात पसरताच एकच खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मुलचेरा पोलिसांना देण्यात आली आहे. मुलचेराचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी सुरू केली. मात्र, ह्या दोन व्यक्ती कोणत्या कामासाठी शेत शिवारात गेले, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, मका शेती शिवारात चारही बाजूने विजेचा प्रवाह सोडण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला हे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मक्याची शेती कोणाची आहे, याबाबत अद्यापही माहिती मिळाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन इसमाचा मृत्यू ; रंगपंचमीच्या दिवशी मूलचेरा येथील दुर्दैवी घटना

गडचिरोली : शेत शिवारात लावण्यात आलेल्या विजेच्या कुंपणाचा शॉक लागून दोन आदिवासी नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी सकाळी मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपूर येथे समोर आली. रमेश लक्ष्‍मण आत्राम रा. मुलचेरा वय अंदाजे 30 वर्ष आणि दौलत बच्चा मडावी रा.मुलचेरा वय अंदाजे 43 वर्ष असे मृतकांचे नावे आहेत.Body:मुलचेरा तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय लगत असलेल्या विवेकानंदपुर हद्दीतील आणि गट्टा मार्गावर मका शेती आहे. पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांने शिवारात कुपणात विजेचा प्रवाह सोडला होता. या तारांना दोन्ही आदिवासी इसमाचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात पसरताच एकच बोंब उडाली.

मृतकांच्या घरच्यांनी रमेश लक्ष्‍मण आत्राम आणि दौलत बुच्या मडावी या दोघांचे मृतदेह पाहून टाहो फोडल्याने संपूर्ण गावकरी घटनास्थळी जमा झाले. याची माहिती मुलचेरा येथील पोलिस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर मुलचेराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी सुरू केली. मात्र ही दोन इसम कोणत्या कामासाठी शेत शिवारात गेले, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र मका शेती शिवारात चारही बाजूने विजेचा प्रवाह सोडण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतक शेतशिवरत सोडण्यात आलेल्या विजेचा ताराला अडकून असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकंदरीत मकाची शेती कोणाची आहे याबाबत अद्यापही माहिती मिळाली नाही मात्र याबाबत पुढील चौकशी मुलचेरा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. मात्र रंगपंचमीच्या दिवशी ही घटना घडली असून लोकाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
Last Updated : Mar 21, 2019, 11:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.