ETV Bharat / state

महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले बोदली हे गाव... पाच वर्षे होऊनही बोदली गावातील समस्या आजही कायम आहेत... यामुळेच आता इथुन पुढे आम्हाला कोणत्याही घोषणा नको, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे, अशी बोदली ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.

बोदली गाव, गडचिरोली जिल्हा
author img

By

Published : Sep 28, 2019, 6:04 PM IST

गडचिरोली - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता, आजही काही गावात आवश्यक तितकाही विकास झाला नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोतील बोदली गावातील लोकांसोबत ईटिव्ही भारतने चर्चा केली आहे.

पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम

मतदारांमध्ये प्रतिनिधींबाबत मोठा रोष

निवडणुकीच्या काळात भेटीगाठी घेणारे उमेदवार, निवडून आल्यानंतर मात्र मतदारसंघातील काही भागात फिरकतही नाही, असे बोलत बोदली गावातील जनतेने आपला प्रतिनिधींबाबतचा रोष व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर, आमच्या गावात आमदारांचा पत्ताच नाही असे, येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'

रोजगार, आरोग्य, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आजही कायम

प्रचार काळात उमेदवार अनेक घोषणा करतात, मात्र नंतर या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच आजही गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत समस्यांसह शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत, असे बोदली ग्रामस्थांनी सांगितले आहे.

सरकारच्या अनेक योजनांपासून गाव अजूनही अनभिज्ञ

शासनाच्या अनेक योजना आजपर्यंत पोहोचल्याच नाही, असा धक्कादायक खुलासा बोदली गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच बारमाही रोजगार उपलब्ध होईल, असे काही उपाय सरकारकडून व्हावे, असे येथील ग्रामस्थांना वाटत आहे. तसेच यापुढे केवळ घोषणा नको, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या गावातील शेतकऱ्यांनी 'ईटीवी भारत' शी बोलताना व्यक्त केली.

story of bodali village from gadachiroli maharashtra
महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरेतून सरकारची कामगिरी

Intro:चौपाल गडचिरोली विधानसभा : रोजगार, आरोग्य, शेतकऱ्यांच्या समस्या कायम ; मतदारांमध्ये रोष

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. संभाव्य उमेदवार मतदारांच्या भेटीगाठीवर भर देत आहेत. मात्र गेल्या पाच वर्षाचा आढावा घेतला असता आमदारांचा पत्ता नाही, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत समस्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. बारमाही रोजगार उपलब्ध होईल, असे काम सरकारकडून व्हावे. केवळ घोषणा नको, कृती हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बोदली गावातील शेतकऱ्यांनी 'ईटीवी भारत' शी बोलताना व्यक्त केली.

Body:सोबत चौपाल आहे

Conclusion:बोदली या गावातील शेतकऱ्यांसोबत केलेला चौपाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.