ETV Bharat / state

रक्तरंजित खेळ : वीस वर्षांत 2 हजार 958 पोलीस हुतात्मा, तर 294 नक्षलवाद्यांना कंठस्नान - naxalite encounters in gadchiroli

नक्षलवादी चळवळीला आजही पूर्णपणे लगाम घालता आलेला नाही. मागील 20 वर्षांचा विचार केल्यास 2 हजार 958 पोलीस जवान हुतात्मा झाले आहेत. तर 294 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. 'ईटीव्ही भारत'ने गडचिरोलीतील या नक्षलवादी चळवळीचा आढावा घेतला आहे.

naxalite encounters in gadchiroli
रक्तरंजीत खेळ : वीस वर्षांत 2 हजार 958 पोलीस हुतात्मा, तर 294 नक्षलवाद्यांना कंठस्नान
author img

By

Published : Dec 9, 2020, 1:44 PM IST

गडचिरोली - आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा रक्तरंजित खेळ आजही सुरू आहे. नक्षलवाद नावाची जिल्ह्याला लागलेली ही कीड दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र नक्षलवादी चळवळीला आजही पूर्णपणे लगाम घालता आलेला नाही. मागील 20 वर्षांचा विचार केल्यास 2 हजार 958 पोलीस जवान हुतात्मा झाले आहेत. तर 294 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. हे आकडे सरकारी नाहीत. तर खुद्द माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयने एका विशेष पत्रकातून दिले आहेत. यावरून जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित खेळाची प्रचिती येते.

रक्तरंजीत खेळ : वीस वर्षांत 2 हजार 958 पोलीस हुतात्मा, तर 294 नक्षलवाद्यांना कंठस्नान

2004 मध्ये उदयास आली भाकपा माओवादी संघटना

2004 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन नक्षलवादी संघटनांचे विलीनीकरण झाले आणि उदयास आली भाकपा माओवादी ही नवी संघटना. पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेपेक्षा आक्रमक पद्धतीने भाकपा माओवादी या संघटनेने 2004 पासून अनेक हल्ले केले. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या भागात माओवाद्यांचे प्राबल्य आहे, त्या भागातील आदिवासी नागरिकांची माओवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयातून हत्या केली. तसेच मोठ्या प्रमाणात शासकीय आणि खासगी संपत्तीची जाळपोळ करून त्या भागात रस्ते पुलांच्या निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात विरोध केला. परिणामी अनेक ठिकाणी विकास कामे सुद्धा रखडली आहेत. त्यामुळे माओवादी कारवाया रोखण्यासह संपूर्ण माओवादी चळवळीचे उच्चाटन करण्याचे मोठे आवाहन सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.

naxalite encounters in gadchiroli
आतापर्यंत 294 नक्षलवाद्यांचा कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
पोलीस खबरी समजून 1764 नागरिकांची हत्या

माओवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरक्षा दलापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. तर आदिवासीबहुल भागात 1 हजार 764 नागरिकांची हत्या केली. यात पोलीस खबरी असल्याचा संशयावरून 1 हजार 105 नागरिकांची तर माओवादी चळवळीत राहून सुरक्षा यंत्रणांची मदत करणाऱ्या 143 माओवादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर माओवादी संघटनेच्या विरोधात काम करणाऱ्या सलवा जुडूमसह इतर संघटनांच्या 516 सदस्यांची तसेच दोनशेहून अधिक राजकीय व्यक्तींचीही आजपर्यंत माओवाद्यांनी हत्या केली आहे.

2 हजार 308 शस्त्रांसह दिड लाखांपेक्षा जास्त काडतुसे लुटली

माओवाद्यांनी सिरोंचा तालुक्यातील आसरल्ली पोलीस ठाणे लुटले होते. तर जवानांच्या हत्येनंतर त्यांची शस्त्रे लुटून नेली होती. त्याचा आकडाही माओवाद्यांनी जारी केला असून 2 हजार 308 शस्त्रांसह दीड लाखांपेक्षा जास्त काडतुसे लुटून नेली आहेत. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयच्या नावाने जारी केलेल्या या विशेष पत्रकात माओवादी संघटनेला गेल्या 20 वर्षांत मिळालेल्या यशासह अनेक ठिकाणी आलेलं अपयश, संघटनेवर झालेला परिणाम, नागरिकांचा जनाधार या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे.

naxalite encounters in gadchiroli
मागील 20 वर्षांचा विचार केल्यास 2 हजार 958 पोलीस जवान हुतात्मा झाले आहेत.
2018 मध्ये गडचिरोली पोलिसांना मोठे यश

माओवाद्यांनी गेल्या वीस वर्षांत दंडकारण्यासह विविध राज्याच्या पोलीसांसह केंद्रीय राखीव दलाच्या निमलष्करी जवानांवर हल्ले केले. यात रेकी करून 'अॅम्बुश' पद्धतीने हल्ल्याची मुख्य रणनीती राहिली आहे. माओवाद्याच्या केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयने जारी केलेल्या पत्रकात 2001 ते 2020 पर्यंत माओवाद्यांच्या गुरील्ला आर्मीकडून तब्बल 4 हजार 464 हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 2 हजार 958 जवान ठार झालेत. तर 3 हजार 507 जवान जखमी झाले आहेत.

माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणाकडून झालेल्या अभियानात 294 माओवादी ठार झालेत. यात सर्वाधिक 42 माओवादी 2018 साली ठार झाले. याच वर्षी गडचिरोली पोलिसांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर बोरीयाच्या जंगलात केलेल्या मोठ्या कारवाईत सर्वाधिक 34 माओवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.