ETV Bharat / state

कुरखेडाचे एसडीपीओ शैलेश काळे यांची नंदुरबारला बदली - Kurkheda SDPO

कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची नंदुरबारला बदली करण्यात आली आहे.

शैलेश काळे
author img

By

Published : May 14, 2019, 11:10 AM IST

Updated : May 14, 2019, 7:57 PM IST

गडचिरोली - महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुरखेडा जवळील लेंडारी नाल्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. या घटनेला कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे जबाबदार असल्याचा ठपका जवानांच्या कुटुंबीयांनी ठेवला होता. कुटुंबीयांचा रोष बघता काळे यांना आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र आता त्यांची थेट नंदुरबार जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील २७ वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. त्यामुळे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे तत्परतेने निघाले. ते जाऊन आल्यानंतर पुन्हा शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाठवण्यात आले. मात्र जवानांच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही. ओपन असलेल्या एका खासगी चारचाकी वाहनाने पोलीस जवान जात असताना नक्षलवाद्यांनी डाव साधला. यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिसरात नक्षल घटना घडली तर त्या घटनास्थळी जाण्यापूर्वी परिसरातील २० ते २५ किलोमीटर भागात तपासणी ('रोड ओपनिंग') केली जाते. मात्र, अशा प्रकारची कुठलीही कारवाई न करता पोलिसांचे पथक घटनास्थळी जायला निघाले होते, अशा खुल्या गाडीचा वापर करणे जवानांच्या जीवावर बेतू शकतो, याचा थोडाही विचार घटनेपूर्वी करण्यात आला नव्हता. या नक्षली हल्ल्यात १५ पोलीस जवान आणि एक खाजगी वाहन चालकाला वीरमरण आले होते.

घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनीही थेट मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांसमोर काळे यांच्यावर आरोप केले होते. कुटुंबीयांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर कुरखेडा येथील प्रभार धानोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे सोपवून घटनेचा तपासही त्यांच्याकडे सोपवण्यात आला. आता एसडीपीओ शैलेश काळे यांनी बेजबाबदारपणे वागत योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचा ठपका ठेवत त्यांची नंदुरबार येथे जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली आहे.

Intro:अखेर एसडीपीओ शैलेश काळे यांची नंदूरबारला बदली

गडचिरोली : महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुरखेडा जवळील लेंडारी नाल्यावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात तब्बल 15 पोलीस जवान व एक खाजगी वाहन चालक शहीद झाले. या घटनेला कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे जबाबदार असल्याचा ठपका जवानांच्या कुटुंबियांनी ठेवला होता. कुटुंबियांचा रोष बघता काळे यांना आधी सक्तीच्या रजेवर तर आता थेट नंदूरबार जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
Body:दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. त्यामुळे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे तत्परतेने निघाले. ते जाऊन आल्यानंतर पुन्हा शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाठवण्यात आले. मात्र जवानांच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही आणि ओपन असलेल्या एका खासगी चारचाकी वाहनाने पोलीस जवान जात असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधला. यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिसरात नक्षल घटना घडली तर त्या घटनास्थळी जाण्यापूर्वी परिसरातील 20 ते 25 किलोमीटर भागात तपासणी ('रोड ओपनिंग') केली जाते. मात्र अशा प्रकारची कुठलीही कारवाई न करता पोलिसांचे पथक घटनास्थळी जायला निघाले होते. अशा खुल्या गाडीचा वापर करणे जवानांच्या जीवावर बेतू शकतो, याचा थोडाही विचार घटनेपूर्वी करण्यात आला नव्हता.

त्यामुळेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांनीही थेट मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांसमोर काळे यांच्यावर आरोप केले होते. कुटुंबीयांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर कुरखेडा येथील प्रभार धानोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे सोपवून घटनेचा तपासही त्यांच्याकडे सोपवण्यात आला. आता एसडीपीओ शैलेश काळे यांनी बेजबाबदारपणे वागत योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचा ठपका ठेवत त्यांची नंदुरबारला जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली आहे.
Conclusion:सोबत sdpo यांचा पासपोर्ट आहे
Last Updated : May 14, 2019, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.