गडचिरोली - गतीमंद युवतीवर वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी अतिप्रसंग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतून युवती गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देविदास मनिराम कुमरे (वय - 35), दिगंबर विश्वनाथ दुर्गे (वय - 52), विजय गजानन कुमरे (वय - 29), सुधाकर तुळशीराम कुमोटी (वय - 45) व मेघशाम नामदेव पेंदाम (वय - 24) यांना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित युवती ही आरमोरी तालुक्यातील रहिवासी आहे. ती गतीमंद आहे. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत गावातील तिघे आणि अन्य गावातील दोन जणांनी तिला पैशाचे आमिष दाखवले. तसेच तिच्यावर वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी अतिप्रसंग केला. शिवाय या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. मागील एक वर्षापासून हा प्रकार सुरु होता. अलीकडेच पीडित युवतीला गर्भधारणा झाली. कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पीडितेच्या काकूने आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
हेही वाचा - ठाण्यात अल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, आरोपी गजाआड