गडचिरोली : शहरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाला शनिवारी सायंकाळच्या सुमारास गंभीर अपघात झाला. मात्र, वाहनातील सर्व 4 व्यक्ती सुदैवाने बचावले आहेत. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्यासह चार जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रस्ता दुभाजकाला धडकल्याने गाडी पलटली -
गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्यासह चार जण असलेले वाहन उलटले. चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकात रस्ता दुभाजकाला धडक दिल्याने ही घटना घडली. या अपघातात चौघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. चारही जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाने क्रेनच्या मदतीने पोलिसांची अपघातग्रस्त सुमो घटनास्थळावरून हलवण्यात आली. वाहन क्रमांक एम एच 33 सी 436 या गाडीचा अपघात झाला. यात एक चालक, दोन बॉडीगार्ड आणि प्रणिल गिल्डा असे चार लोक होते.
पदावर रूज होताच 3 दिवसांनी अपघात -
या जीवघेण्या अपघातातून हे अधिकारी- कर्मचारी सुदैवाने बचावले आहेत. विशेष म्हणजे गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा हे 3 दिवसांपूर्वी पदावर रुजू झाले आहेत.
हेही वाचा - बाधितांची संख्या कमी न झाल्यास, लॉकडाऊन अटळ - पालकमंत्री छगन भुजबळ