गडचिरोली - जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात (Gadchiroli Nagar Panchayat Result) संमिश्र कल पाहायला मिळत आहेत. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या अहेरी नगरपंचायतीवर भाजपने दमदार कामगिरी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मूलचेरा - सिरोंचा येथे जागा जिंकल्या आहेत. कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपने बहुमत मिळवले आहे. कोरची नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात जाणार हे निश्चित झाले असून धानोरा येथेही काँग्रेसने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची संख्या गाठली आहे. दक्षिण गडचिरोलीतल्या चामोर्शी येथे काँग्रेस 8 जागांसह अपक्ष 1 जागेच्या मदतीने सत्ता स्थापन करणार आहे. मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या आघाडीने बहुमत मिळविले आहे. टोकावरच्या सिरोंचा नगरपंचायतीवर माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या 10 जागा एकहाती निवडून आल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक रणनीतीला यश आले असून आजवर जिल्ह्यातील नगरपंचायतीत अल्प स्थान असलेल्या शिवसेनेला एकूण 14 जागा मिळाल्या आहेत. यात मूलचेरा येथे हा पक्ष सत्तेत सहभागी होणार आहे.
दरम्यान, चामोर्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा जिंकत उत्तम कामगिरी केली असून शहर विकासासाठी आपण सज्ज राहू अशी भावना विजयी काँग्रेस उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
आकडेवारी अशी -
जिल्हा गडचिरोली - एकूण 9 नगरपंचायती
एकूण जागा-- 153
निकालातील पक्षीय बलाबल
काँग्रेस - 39
भाजप - 36
राष्ट्रवादी - 27
शिवसेना - 14
इतर - 36
ही टोटल 152 आहे, भामरागडची एक जागा निकाल शिल्लक आहे
जिल्ह्याची एकूण आकडेवारी अशी -
जिल्हा गडचिरोली --- एकूण 9 नगरपंचायती
एकूण जागा 153
घोषित निकाल 152
जिल्हा गडचिरोली
सिरोंचा नगरपंचायत- एकूण जागा- 17
माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघटनेला बहुमत
भाजप –
शिवसेना –2
राष्ट्रवादी काँग्रेस–5
काँग्रेस –
आदिवासी विद्यार्थी संघटना– 10
जिल्हा गडचिरोली
भामरागड नगरपंचायत-एकूण जागा 17
त्रिशंकू सत्ता स्थिती, भाजप मोठा पक्ष
भाजप – 5
शिवसेना –1
राष्ट्रवादी –3
काँग्रेस –2
इतर -5
एका जागेचा निकाल शिल्लक आहे
जिल्हा गडचिरोली
एटापल्ली नगरपंचायत--एकूण जागा 17
त्रिशंकू स्थिती, काँग्रेस मोठा पक्ष, अपक्षांची भूमिका महत्वाची असेल
भाजप – 3
शिवसेना –
राष्ट्रवादी –3
काँग्रेस –5
इतर-6
जिल्हा गडचिरोली
अहेरी नगरपंचायत---एकूण जागा 17
या नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती आहे. भाजप मोठा पक्ष आहे
भाजप - 6
शिवसेना -2
राष्ट्रवादी - 3
काँग्रेस -
अपक्ष - 1
आविस - 5
जिल्हा गडचिरोली
मूलचेरा नगरपंचायत-एकूण जागा 17
राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांनी आघाडी केली होती. या आघाडीला बहुमत मिळाले
भाजप – 1
शिवसेना –4
राष्ट्रवादी –7
काँग्रेस –
इतर –5
जिल्हा गडचिरोली
चामोर्शी नगरपंचायत-- एकूण जागा 17
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत
भाजप – 3
शिवसेना –
राष्ट्रवादी –5
काँग्रेस -8
इतर --1
जिल्हा गडचिरोली
धानोरा नगर पंचायत--एकूण जागा 17
काँग्रेसला स्पष्ट बहुमत
भाजप – 3
शिवसेना –
राष्ट्रवादी –
काँग्रेस -13
इतर --1
जिल्हा गडचिरोली
कोरची नगर पंचायत--एकूण जागा 17
काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार
भाजप – 6
शिवसेना –
राष्ट्रवादी –1
काँग्रेस -8
इतर --2
जिल्हा गडचिरोली
कुरखेडा नगर पंचायत--एकूण जागा 17
भाजपला बहुमताची सत्ता
भाजप – 9
शिवसेना –5
राष्ट्रवादी –
काँग्रेस -3