ETV Bharat / state

धास्तीची पाठशाळा; गडचिरोलीत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांविनाच वाजली शाळेची घंटा - गडिचिरोली शाळा सुरू बातमी

आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार म्हटल्यावर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. परंतु, कोरोना महामारीचे संकट अद्यापही दूर न झाल्याने 'मस्ती'ची पाठशाळा आता 'धास्ती'ची पाठशाळा झाली आहे.

Schools
गडचिरोलीत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांविनाच वाजली शाळेची घंटा
author img

By

Published : Nov 23, 2020, 3:10 PM IST

Updated : Nov 23, 2020, 3:29 PM IST

गडचिरोली - कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची पहिली घंटा आज (23 नोव्हेंबर) वाजली. आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार म्हटल्यावर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. परंतु, कोरोना महामारीचे संकट अद्यापही दूर न झाल्याने 'मस्ती'ची पाठशाळा आता 'धास्ती'ची पाठशाळा झाली आहे. त्यामुळेच गडचिरोली शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांविनाच शाळेची घंटा वाजल्याचे चित्र दिसून आले.

प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी घेतलेला आढावा

अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह-

23 नोव्हेंबर म्हणजे आज सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. तत्पूर्वी या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 756 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

Schools
कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गडिचिरोलीत शाळा झाल्या सुरू

बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती -

कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार प्रत्येक शाळांनी वर्गखोल्यांची स्वच्छता केली. सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, थर्मामीटर असे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांची तपासणी करणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे पहिल्याच दिवशी अनेक शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Schools
गडचिरोलीत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांविनाच वाजली शाळेची घंटा

392 शाळा तर 167 कनिष्ठ महाविद्यालये -

गडचिरोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल तसेच शिवाजी महाविद्यालयामध्ये दहावी व बारावीच्या बोर्डाचे परीक्षा सेंटर देण्यात आल्याने येथे आज वर्ग घेण्यात आले नाही. इतर शाळांमध्ये फेरफटका मारला असता, विद्यार्थीच शाळेत आले नाहीत. गडचिरोली जिल्ह्यात नववी ते दहावीच्या 392 शाळा तर 167 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 2 हजार 756 शिक्षक कार्यरत आहेत. आतापर्यंत जवळपास 80 टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यात अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी -

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अनेक शाळांना भेटी देऊन उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी शाळा कोणती खबरदारी घेत आहेत, याची पाहणी केली. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बोटावर मोजण्याइतकी होती.

हेही वाचा -राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली; जाणून घ्या कुठे उघडल्या शाळा, तर कुठे आहेत बंद

हेही वाचा - अर्णब प्रकरण : रायगड न्यायालयातील पुनर्विचार याचिका, जामीन अर्जाबाबत आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष

Last Updated : Nov 23, 2020, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.