ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : गडचिरोलीत प्रथमच रेकॉर्ड ब्रेक ‘मका’ खरेदी

आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सिंचनासाठी कोणताही मोठा प्रकल्प नाही. तरीही उपलब्ध पाणी, साधनांच्या आधारे भात पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, दरवर्षी धान पिकाचे उत्पादन खर्च व मिळणारा अत्यल्प भाव यामुळे जिल्ह्यातील शेतकरीही आता रब्बी हंगामात मका पिकाकडे वळल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

record-break-maize-purchase-for-the-first-time-in-gadchiroli
गडचिरोलीत प्रथमच रेकॉर्ड ब्रेक ‘मका’ खरेदी...
author img

By

Published : Jul 30, 2020, 5:49 PM IST

गडचिरोली- जिल्ह्यात यावर्षी प्रथमच मार्केटींग फेडरेशनतर्फे मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या खरेदीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने प्रथमच रेकॉर्ड ब्रेक ४७ हजार क्विंटल मका पिकाची खरेदी झाली आहे. या केंद्रावर मका विक्री केलेल्या ९१० शेतकऱ्यांना अल्पवधीतच ८ कोटी ३२ लाखांचे चुकारेही मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात जिल्हाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांना माल बाहेर जिल्ह्यात वाहतूक करता येत नसल्याने शेतकऱ्यांना माल विकता यावा यासाठी शासनाने गडचिरोली जिल्ह्यात तीन मका खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आरमोरी, मुलचेरा व चामोर्शी या तीन ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

गडचिरोलीत प्रथमच रेकॉर्ड ब्रेक ‘मका’ खरेदी...

सर्वप्रथम शेतकऱ्यांची नोंदणी केल्यानंतर मका खरेदीला सुरुवात झाली. यामध्ये आरमोरीच्या खरेदी केंद्रावर ३४४ शेतकऱ्यांकडून १६ हजार ३४२ क्विंटल, चामोर्शीच्या केंद्रावर ४४६ शेतकऱ्यांकडून २३ हजार ७९१ क्विंटल व मुलचेरा येथील केंद्रावर १२० शेतकऱ्यांकडून ७ हजार १३० क्विंटल मका खरेदी करण्यात आली. या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावानुसार ८ कोटी ३२ लाख ५४ हजार १६० रूपयांचे चुकारे अदा करण्यात आले.

आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सिंचनासाठी कोणताही मोठा प्रकल्प नाही. तरीही उपलब्ध पाणी, साधनांच्या आधारे भात पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, दरवर्षी धान पिकाचे उत्पादन खर्च व मिळणारा अत्यल्प भाव यामुळे जिल्ह्यातील शेतकरीही आता रब्बी हंगामात मका पिकाकडे वळल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. यापूर्वी जिल्ह्यात मका खरेदी केंद्र नसल्याने पिकवलेला माल बाहेर जिल्ह्यात किंवा खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत होती. आता यापुढेही जिल्ह्यातच खरेदी केंद्र राहिल्यास आणखी शेतकरी मका पिकाकडे वळतील आणि मका पिकाचे उत्पादन वाढेल यात शंका नाही.

जिल्ह्यात बरेच शेतकरी धान पीक निघाल्यानंतर रब्बी हंगामात चना, गहू, मूग अशा पिकांची लागवड करतात. मात्र, गत दोन वर्षांपासून काही शेतकरी मका पिकाची लागवड करत असून हेक्टरी ४६ क्विंटल उत्पादन होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून दिसून आले आहे. यात चामोर्शी तालुका मका उत्पादनात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. ७ लाख ७५ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यात १७ केंद्राना मंजुरी होती. या खरेदी केंद्रांवर आजपर्यंत २१ हजार २३१ शेतकऱ्यांकडून ७ लाख ७५ हजार ४६८.७२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांना हमीभाव स्वरुपात १४० कोटी ७४ लाख ७५ हजार ७२६ रुपये तर बोनस स्वरुपात ४० कोटी ४९ लाख २४ हजार ८६ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. धान खरेदीत गडचिरोली जिल्हा, भंडारा व गोंदियानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा- मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; लष्कराच्या 3 जवानांना वीरमरण, 4 जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.