गडचिरोली- जिल्ह्यातील अहेरी येथील स्वयंहासयता महिला बचत गटांच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्लेट निर्मिती प्रकल्पाचे निर्माण झाले आहे. या प्रकल्पाचे आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्यपालांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेसह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सौर ऊर्जा प्लेट निर्मिती प्रकल्पाचे रीतसर उद्घाटन केल्यानंतर राज्यपालांनी प्रकल्पातील कामाचे निरीक्षण केले. यावेळी प्रकल्पाशी निगडित महिला बचत गटांच्या सदस्यांची त्यांनी प्रशंसा केली. सौर ऊर्जा प्लेट निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून देश-विदेशात आहेरीचे नाव व्हावे, अशी भावना राज्यपाल कोशियारी यांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी अहेरी येथील एकलव्य मॉडेल स्कूलचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर राज्यपाल दुपारी गडचिरोली येथील विविध कर्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
हही वाचा- भामरागड तालुक्यात प्रथमच अंगणवाडीच्या बालकांना गणवेशासह साहित्य वाटप