ETV Bharat / state

गडचिरोलीत पूरस्थिती कायम; भामरागडचा चौथ्यांदा तुटला संपर्क - gadchiroli flood

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पूरस्थिती मात्र अद्यापही कायम आहे. भामरागड २० दिवसात चौथ्यांदा पुराच्या विळख्यात सापडले आहे. भामरागड मध्ये पाणी शिरले असून तिथला संपर्क तुटला आहे. त्यामुळे भामरागडमधील ४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गडचिरोली : पावसाचा आोसरला तरी पूरस्थिती कायम
author img

By

Published : Aug 14, 2019, 9:20 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती मात्र अद्यापही कायम आहे. भामरागड २० दिवसात चौथ्यांदा पुराच्या विळख्यात सापडले आहे. भामरागड मध्ये पाणी शिरले असून तिथला संपर्क तुटला आहे. त्यामुळे भामरागडमधील ४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गडचिरोली : पावसाचा आोसरला तरी पूरस्थिती कायम

सर्वच सिंचन प्रकल्पांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्या-उपनद्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १२ पैकी ९ तालुके अतिवृष्टीग्रस्त आहेत. जिल्ह्यातील धानोरामध्ये १४१ मिमी, चामोर्शीमध्ये १०१ मिमी, देसाईगंजमध्ये १४० मिमी, आरमोरीमध्ये ११८ मिमी, कुरखेडामध्ये १४३ मिमी, एटापल्लीमध्ये १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पूरस्थितीवर परिणाम करणारे गोसेखुर्द, दीना, चिचडोह, मेडीगड्डा, येंगलखेडा सिंचन प्रकल्प भरल्याने नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.

जिल्ह्यात एकूण १८ मुख्य मार्ग पुराचे पाणी आल्याने सकाळी बंद होते. त्यातील ८ पूर्ववत झाले असून अद्याप १० मार्ग पाण्याखाली आहेत.नागपूर-हैद्राबाद, राजनांदगाव येथे जाणारी वाहने अडकून पडली आहेत. भामरागड येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, छत्तीसगड राज्यातील मुसळधार पावसामुळे भामरागडचे प्रवेशद्वारावर असलेल्या पर्लकोटा नदीत पाण्याची पातळी वाढली आहे. छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास भामरागडची पूरस्थिती आणखी वाईट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रशासन परीस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली आहे.

Intro:गडचिरोलीत पावसाची अल्प विश्रांती, पूरस्थिती कायम असून चौथ्यांदा तुटला भामरागडचा संपर्क

गडचिरोली : जिल्ह्यात पावसाने अल्प विश्रांती घेतली आहे. मात्र जिल्हयात पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १२ पैकी ९ तालुके अतिवृष्टीग्रस्त असून सर्वच सिंचन प्रकल्पातुन विसर्ग सुरु झाल्याने नद्या-उपनद्यानी पात्र सोडले आहे. भामरागड पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात सापडला असून २० दिवसात चौथ्यांदा भामरागड मध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथील ४० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.Body:गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा-१४१ मिमी , चामोर्शी १०१ मिमी, देसाईगंज १४० मिमी, आरमोरी ११८ मिमी , कुरखेडा १४३ मिमी , एटापल्ली १६० मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे या जिल्ह्याच्या पुरस्थितीवर परिणाम करणारे गोसेखुर्द- दीना- चिचडोह-मेडीगड्डा-येंगलखेडा हे सिंचन प्रकल्प तुडुंब भरल्याने नद्यानी रौद्ररूप धारण केले आहे. भामरागड येथे पावसाचे प्रमाण कमी असले तरी छत्तीसगड राज्यातील मुसळधार पावसामुळे भामरागडच्या प्रवेशद्वारावर असलेली पर्लकोटा नदी काळ बनली आहे. हे शहर पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात सापडले आहे.

या तालूकास्थानाने २० दिवसात चौथा मोठा पूर पाहिला आहे. प्रशासनाने येथील ४० कुटुंबे पुन्हा सुरक्षित जागी हलविली आहे. दरम्यान छत्तीसगड राज्यात पुराचं जोर कायम राहिल्यास भामरागडची अवस्था बिकट होणार आहे. दरम्यान जिल्ह्यात सकाळी एकूण १८ मुख्य मार्ग पुराचे पाणी महामार्गावर आल्याने बंद होते. त्यातील ८ पूर्ववत झाले असून अद्याप १० मार्गावर पुराचे पाणी आहे. जागोजागी नागपूर-हैद्राबाद, राजनांदगाव येथे जाणारी वाहने अडकून पडली आहेत. प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

व्हिज्युअल आणि बाईट १) कैलास अंडील , तहसीलदार , भामरागड

Conclusion:व्हिज्युअल आणि बाईट १) कैलास अंडील , तहसीलदार , भामरागड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.