गडचिरोली - जिल्ह्यातील अनेक गावे आजही शिक्षण सरकारी योजनांपासून वंचित आहेत. दुर्गम भागातील गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व समजावे त्याचबरोबर शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या 'कन्या आपल्या दारी' ही योजना सुरू केली आहे.
स्त्री शिक्षण व महिला सबलिकरण याबाबत शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही मुलींच्या शिक्षणाकडे योग्यप्रकारे लक्ष दिले जात नाही. यामुळे जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध गावात जाऊन 'आपली कन्या आपल्या दारी' या योजनेतून स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देत आहेत. त्याचबरोबर विविध सरकारी योजनांची माहिती देत आहेत. ही सर्व माहिती आदिवासी भाषेत देत असल्याने तेथील नागरिकांना समजण्यासही मदत होत आहे.
गजचिरोली जिल्हा म्हणजे एक भैगोलिक मानाने घनदाट जंगल, पाण्याने दुथडी भरुन वाहणारे नदी-नाल्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. हा जिल्ह्यात रस्ते वीज अशा सुविधांपासून वंचित असून डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेली छोटीछोटी आदिवासी गावे आहेत. आजही या गावांमध्ये दारिद्र्य, निरक्षरता मोठ्या प्रमाणावर आपणास पहावयास मिळते. त्यात नक्षलवाद्यांचा कारवायात आणखी अडचणींची भर पडले. शहरी भागात आपण वाचत असतो की "शिकलेली आई घर पुढे नेई". पण, या भागात शिक्षण अगदी प्रसाराच्या प्राथमिक अवस्थेतच असल्याने कित्येक आई आणि त्यांच्या पोटी जन्म घेणारी मुलगी या दोघीही निरक्षरच आहेत. त्यात पुन्हा शिक्षणाचे महत्त्व फारसे या भागांमध्ये आजही रुजलेले नाही. अशा ठिकाणी पोलीसांच उपक्रम "आपल्या कन्या आपल्या दारी" नक्कीच जागृती निर्माण होईल.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या आपली कन्या आपल्या दारी या अभिनव उपक्रम सुरु केली आहे.उपपोस्ट लाहेरीच्या ग्राम भेटी अभियान दलाने आबुजमाड पर्वत रांगातील गुंडेनूर या आदीवासी गावास भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली व उपस्थितांना महिला पोलीस शिपाई शोभा गोदारी, सोनम लांजेवार, सोनाली नैताम यांनी महिलांसाठी शासन राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच महिला संबंधीच्या विविध कायद्यांबाबतही माहिती दिली. यावेळी महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात आले. तसेच सर्वांना खाऊचेही वाटप करण्यात आले. महिलांची उपस्थिती व स्पर्धेतील सहभाग यावरून त्यांचा शासनाबद्दल असलेला विश्वास यावेळी निदर्शनास आला.
यावेळी अभियान दलाचे नेतृत्व प्रभारी अधिकारी अविनाश गोळेगावकर, 37 बटालियनचे सहायक कमांडंट संतोष भोसले, शीतलाप्रसाद, पोलीस उपनिरीक्षक विजय सपकाळ, महादेव भालेराव आदींनी केले.
हेही वाचा - भामरागडमध्ये "मीच जबाबदार" नाटकाद्वारे जनजागृती, कोरोना नियम मोडल्यास होणार कारवाई