गडचिरोली : जिल्ह्यात आज (26 एप्रिल) 272 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 447 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 18917 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 14246 वर पोहचली. तसेच सध्या 4336 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
335 जणांचा मृत्यू-
आत्तापर्यंत जिल्ह्यात ऐकूण 335 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 13 नवीन मृत्यू झाले. यात गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, अहेरी येथील 70 वर्षीय पुरुष, सोमलवाडा (जिल्हा नागपूर) येथील 49 वर्षीय महिला, सालईटोला (कुरखेडा, गडचिरोली) येथील 65 वर्षीय महिला, धानोरा (गडचिरोली) येथील 66 वर्षीय पुरुष, नवेगाव (गडचिरोली) येथील 38 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील 38 वर्षीय पुरुष, इंदिरा वार्ड (एटापल्ली, गडचिरोली) येथील 48 वर्षीय पुरुष, बल्लारशा (चंद्रपूर) येथील 52 वर्षीय पुरुष, हनुमाननगर (ब्रम्हपुरी, चंद्रपूर) येथील 55 वर्षीय पुरुष, स्नेहानगर (गडचिरोली) येथील 75 वर्षीय पुरुष, आरमोरी (गडचिरोली) येथील 54 वर्षीय पुरुष, जेप्रा (गडचिरोली) येथील 41 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.31 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.92 टक्के तर मृत्यू दर 1.77 टक्के झाला.
..या तालुक्यात नवे बाधित-
नवीन 272 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 171, अहेरी तालुक्यातील 9, आरमोरी 27, भामरागड तालुक्यातील 8, चामोर्शी तालुक्यातील 14, धानोरा तालुक्यातील 9, एटापल्ली तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 6 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 447 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 188, अहेरी 33, आरमोरी 28, भामरागड 5, चामोर्शी 24, धानोरा 8, एटापल्ली 21, मुलचेरा 14, सिरोंचा 11, कोरची 32, कुरखेडा 43, तसेच वडसा येथील 40 जणांचा समावेश आहे.