ETV Bharat / state

Naxals burn Vehicles : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ; रस्त्यांच्या कामाला विरोध - भामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

भामरागड (Bhamragad Taluka) तालुक्यात रस्त्याच्या कामावर असलेल्या 18 वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ (Naxals burn road construction vehicles) करण्यात आली आहे. १० ते १५ बंदुकधारी नक्षलवाद्यांनी वाहनांना आग लावली. तसेच ते तद्वतच लाल रंगाचा बॅनर लावून निघून गेले.

Naxals burn vehicles
नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ
author img

By

Published : Jan 21, 2022, 6:29 PM IST

Updated : Jan 21, 2022, 10:47 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील विकासकामांना नक्षलवाद्यांकडून (Naxals) विरोध केला जात आहे. यावेळी रस्त्याच्या कामावर असलेल्या 18 वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ (Naxals burn road construction vehicles) करण्यात आली आहे. यात 15 ट्रॅक्टर, 2 जेसीबीं, एक मातीरोड सपाटीकरण करण्याची ग्रेडरगाडीचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील (Bhamragad Taluka) इरपणार गावाजवळील ही घटना आहे.

हेही वाचा - 'आमच्या पोलिसांचा मला अभिमान'; गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

  • रस्त्यांच्या कामांचा नक्षलवाद्यांकडून विरोध -
    नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

या भागातील दोडराज- इर्फणार- नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू होते. यासाठी ही सर्व 11 वाहने काम करत होती. त्यावेळीच नक्षलवाद्यांकडून काम थांबवून वाहनांची जाळपोळ सुरू केली. तसेच त्यांनी या भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा विरोध केला.

  • नक्षलवाद्यांनी लावले बॅनर -

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धोडराज ते इरपनार 6 कि.मी. रस्त्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरु होते. जवळपास 18 ते २0 वाहने सदर कामावर होती. काही कंत्राटदाराचे वाहने होती तर स्थानिक परिसरातील लोकांची काही वाहने होती. अगदी गावालगत खड्डा खोदून माती काढण्याचे काम सुरू होते. अंदाजे २ ते २.३० वाजताचे दरम्यान ४० ते ५०च्या संख्येने असलेल्या नक्षल्यांनी खड्ड्याच्या सभोवार आले. १० ते १५ बंदुकधारी पुढे येऊन वाहनांना आग लावली. तसेच ते तद्वतच लाल रंगाचा बॅनर लावून निघून गेले. सुरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचार अशा आशयाचे बॅनर गावाच्या वेशीवर लावले होते.

  • नक्षलवादी ​दुलसा नरोटेला केली होती अटक

14 जानेवारीला गट्टा दलम येथील करण उर्फ ​​दुलसा नरोटे (Dulsa Narote Arrest By Gadchiroli Police) या दोन लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती एसपी अंकित गोयल (SP Ankit Goyal Spoke About Dulsa Narote Arrest) यांनी दिली होती.

हेही वाचा - Gadchiroli Police Action On Naxal : दोन लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांकडून अटक

Last Updated : Jan 21, 2022, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.