ETV Bharat / state

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून एकाची निर्घृण हत्या - killed by naxalites in gadchiroli

पोलीसांचा खऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या
author img

By

Published : Feb 26, 2021, 6:39 PM IST

गडचिरोली : नक्षल्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत पुरसलगोंदी येथे एका इसमाची गोळ्या झाडून हत्या केली. अशोक कुरचामी (३४) (रा.मंगुठा, ता.अहेरी) असे मृत इसमाचे नाव आहे. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी ही हत्या केल्याचा अंदाज आहे.

मृतक अशोक कुरचामी हा एटापल्ली तालुक्यात वास्तव्य करीत होता. आर्थिक अडचणीमुळे तो पैसे मागण्यासाठी पुरसलगोंदी येथे आपल्या सासऱ्याकडे गेला होता. ही बाब कळताच दोन साध्या वेशभूषेतील नक्षली अशोकच्या सासऱ्यांच्या घरी गेले आणि पिस्तुलातून चार गोळ्या झाडून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. तत्पूर्वी गेल्या पंधरा दिवसात गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.