ETV Bharat / state

गडचिरोलीत नक्षलींचे थैमान सुरुच; तीन वाहनांची जाळपोळ, लाखोंचे नुकसान - vehicles

बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण काम सुरू आहे. याठिकाणी असलेला एक टँकर, दोन सिमेंट कॉन मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी जाळून टाकले.

नक्षलवाद्यांकडून तीन वाहनांची जाळपोळ
author img

By

Published : May 13, 2019, 12:09 PM IST

गडचिरोली - माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. वाहनांची जाळपोळ, भूसुरुंग स्फोट, पोलीस खबरी म्हणून सामान्य नागरिकांची हत्या असे सत्र सुरूच आहे. अशातच आता नक्षलवाद्यांनी आणखी तीन वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण काम सुरू आहे. याठिकाणी असलेला एक टँकर, दोन सिमेंट कॉन मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी जाळून टाकले. यात ठेकेदाराचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

naxalites
नक्षलवाद्यांकडून तीन वाहनांची जाळपोळ

सदर रस्त्याचे काम यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा हे करीत असल्याची माहिती असून जाळण्यात आलेली वाहने आणि साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या मालकीचे आहे. गेल्या १५ दिवसातील ही सहावी घटना असून नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे सामान्य नागरिकांत मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.

Intro:गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा तीन वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. वाहने जाळपोळ, भूसुरुंग स्फोट, पोलीस खबरी म्हणून सामान्य नागरिकाची हत्या सत्र सुरूच असून आणखी तीन वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवारी रात्री घडली.Body:एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणा-या मार्गावर पंतप्रधान ग्राम सड़क योजना निर्माण कामावरील एक टॅकर, दोन सिमेंट कॉन मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री नक्षलवाद्यांकडून जाळून टाकण्यात आले. यात ठेकेदाराचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर रस्ता काम यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे
अनिल सेवदा नामक ठेकेदार करीत असल्याची माहिती असून जाळण्यात आलेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे असल्याची माहिती आहे.

गेल्या 15 दिवसातील ही सहावी घटना असून नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे सामान्य नागरिकांत मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
Conclusion:सोबत फोटो आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.