ETV Bharat / state

गडचिरोली पोलिसांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, पीएसआयसह एक पोलीस जवान हुतात्मा.. - गडचिरोली जवान शहीद

भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगलात नक्षलवाद्यांच्या विरोधात अभियान राबवत असताना पोलीस दलावर हल्ला झाला आहे. यामध्ये दोन पोलीस हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी झाले आहेत.

naxalites attack in gadchiroli
गडचिरोलीत पोलीस दलावर नक्षलवादी हल्ला
author img

By

Published : May 17, 2020, 11:20 AM IST

Updated : May 17, 2020, 4:29 PM IST

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानावर असलेल्या सी-60 पथकाला लक्ष बनवून नक्षल्यांनी लावलेल्या अ‌ॅम्बूशमध्ये रविवारी पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने (३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात रविवारी सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

गडचिरोली पोलिसांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, पीएसआयसह एक पोलीस जवान हुतात्मा..

रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून आणला. त्यानंतर गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.

naxalites attacked on police force in gadchiroli
(डावीकडून) हुतात्मा पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने (३०), व शिपाई किशोर आत्राम..

वीरमरण आलेल्या जवानांचे पार्थिव दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हुतात्मा धनाजी होनमने हे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. तर शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे सुरु केले आहे.

हेही वाचा : सिमडेगामध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, तर एक गंभीर; पाच जणांना अटक

Last Updated : May 17, 2020, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.