ETV Bharat / state

आगामी काळात नक्षलवाद कायमचा संपेल- पोलीस महासंचालक हेमंत नगराळे - Gadchiroli marathi news

येणाऱ्या काळात लवकरच नक्षलवाद गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातून संपेल, असा आशावाद पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला.

State Director General of Police Hemant Nagarale on a tour of Gadchiroli district
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर
author img

By

Published : Feb 28, 2021, 7:56 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीसांची कारवाई धडाकेबाज आहे. येणाऱ्या काळात लवकरच नक्षलवाद गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातून संपेल, असा आशावाद पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला.

दुर्गम पोलीस ठाण्याला भेटी-

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. सावरगाव पोलीस ठाण्याचा दौरा केल्यानंतर पोलीस महासंचालक थेट अतिसंवेदनशील अशा देचलीपेठाच्या पोलीस ठाण्यात पोहचले. तिथे पोलीस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जवानांच्या कुटुंबियासह जवानांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस दलातील नोकरीच्या सुरुवातीच्या काळातील जंगलात केलेल्या अभियानाची आठवण ताजी करत गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या जवानांच्या कामाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी कौतुक केले.

State Director General of Police Hemant Nagarale on a tour of Gadchiroli district
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर

हेही वाचा- संतापजनक! आश्रम शाळेतील मुलीवर अधीक्षकानेच केला अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.