ETV Bharat / state

पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय, भामरागडमध्ये नक्षल्यांकडून एकाची हत्या - नागरिकाची

भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदतकेंद्रांतर्गत येणाऱ्या मर्दहुर गावात नक्षल्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली.

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, भामरागडमध्ये नक्षलींकडून नागरिकाची हत्या
author img

By

Published : May 5, 2019, 6:39 PM IST

Updated : May 5, 2019, 8:50 PM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदतकेंद्रांतर्गत येणाऱ्या मर्दहुर गावात नक्षल्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली. डोंगा कोमटी वेडदा, असे मृत नागरिकाचे नाव असून तो नैनवाडी गावातील रहिवासी होते. ते लग्नसोहळ्यासाठी मर्दहूर गावात गेले होते.

आज पहाटे नक्षल्यानी डोंगा कोमटी वेडदा या नागरिकाला झोपेतून उठवून आपल्या सोबत नेऊन हत्या केली. या नागरिकाची पोलीस खबऱ्या असल्याचा संशयावरून केल्याची माहिती आहे. मागील ६ दिवसात नक्षल्यांकडून अशी तिसरी घटना घडली. तत्पूर्वी महाराष्ट्र दिनाच्या पहाटेला कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षलवाद्यांनी 27 वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर काही तासातच जांभूळखेडा येथील लेंढारी नाल्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यामध्ये 15 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज पुन्हा हत्येची घटना घडली आहे. तर काल भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात नक्षली बॅनर आढळून आले होते.

Intro:गडचिरोलीत नक्षल्याकडून इसमाची हत्या

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच असून भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या मर्दहुर गावातील डोंगा कोमटी वेडदा या इसमाची हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली. तो नैनवाडी या गावचा रहिवासी होता. गेल्या सहा दिवसात नक्षलवाद्यांकडून घडवण्यात आलेली ही तिसरी घटना आहे.Body:डोंगा कोमटी वेडदा हा लग्नसोहळासाठी भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावात गेला होता. मात्र पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आज पहाटे नक्षल्यानी त्याला झोपेतून उठवून आपल्या सोबत जंगलात घेऊन गेले व त्याची हत्या केली. गेल्या सहा दिवसातील ही तिसरी घटना आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र दिनाच्या पहाटेला कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षलवाद्यांनी 27 वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर काही तासातच जांभूळखेडा येथील लेंढारी नाल्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात पंधरा जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर आज पुन्हा हत्येची घटना घडली. काल भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात नक्षली बॅनर आढळून आले होते.
Conclusion:फाईल फोटो वापरावा
Last Updated : May 5, 2019, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.