गडचिरोली - आशिया खंडातील प्रसिद्ध कुंभमेळा मेडारम जत्रेला बुधवारी प्रारंभ झाला. या यात्रेला 900 वर्षांची परंपरा आहे. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या जत्रेला यावर्षी दीड कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.
तेलंगाणातील प्रसिद्ध अशा मेडारम येथील सम्मक्का सारक्क जत्रेला बुधवारी प्रारंभ झाला. सारलम्म देवी, पगिडिद्धेराजा, गोविंदा राजाचे जत्रेच्या ठिकाणी 4 वाजताच्यादरम्यान आगमन झाले. यानंतर आदिवासी पुजाऱ्यांनी आपल्या परंपरेनुसार पूजा-अर्चना केली. यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच आतापर्यंत 40 लाख भाविकांनी यात्रेचे दर्शन घेतले आहे. अत्यंत वैभवशाली असलेल्या या आदिवासी जत्रेसाठी तेलंगणासह छत्तीसगढ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडीशा, झारखंड, कर्नाटक राज्यातील आदिवासी तसेच इतर जाती-धर्माचे भाविक सहभागी होणार आहेत. यावर्षी जवळपास जवळपास दीड कोटींहून अधिक भाविक जत्रेत दर्शनासाठी येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया
तर आज (गुरूवारी) सम्मक्का देवीच्या आगमनाची प्रधान पूजा होणार आहे. बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस ही यात्रा चालणार आहे. यानंतर शनिवारी पुन्हा देवी देवतांचा वन प्रवेश होणार आहे.