गडचिरोली - विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवाच्या गजरामध्ये यात्रेला सुरुवात झाली. भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोलीवरुन 60 यात्रा बसगाड्यांची सोय केली आहे. यात्रेसाठी व्यवसायिकांचे तसेच भाविकांचे जत्थे मार्कंडादेव नगरीत दाखल झाले असून, रोहयो मंत्री संदीपान भामरे यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
हेही वाचा -
सोने महागले! जाणून घ्या, कारण...
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. वैनगंगा नदी काठावर हे मंदिर असून, येथे वैनगंगा नदी उत्तर वाहिनी असल्याने या मंदिराला आणखीनच महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी दहा ते पंधरा दिवस यात्रा भरते. यात्रेत विदर्भाच्या विविध भागातील लाखो भाविक सहभागी होत असतात. 23 फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता भाऊसाहेब म्हशाखेत्री दांपत्याच्या असते त्रिपूर पूजन करुन मंदिराच्या कळसावर दिवा लावला जाणार आहे. तसेच 25 फेब्रुवारीला मार्कंडेश्वर पालखी निघणार आहे.
मुख्य पूजेनंतर दर्शनासाठी रांगेत येणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीतर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती, मार्कंडेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -