गडचिरोली - जिल्ह्यात शनिवारी 574 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.दिवसभरात 400 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 16 हजार 623 वर पोहचली. तसेच सध्या 4 हजार 711 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आज 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 32 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 20 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 64 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला, यांचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.66 टक्के तर मृत्यू दर 1.92 टक्के इतका झाला आहे.
नवीन 574 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 184, अहेरी तालुक्यातील 47, आरमोरी 55, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 40, धानोरा तालुक्यातील 23, एटापल्ली तालुक्यातील 31, कोरची तालुक्यातील 23, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 30, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 30, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 27 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 76 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 400 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 176, अहेरी 38, आरमोरी 25, भामरागड 10, चामोर्शी 14, धानोरा 23 , एटापल्ली 20, मुलचेरा 12, सिरोंचा 9, कोरची 27, कुरखेडा 9, तसेच वडसा येथील 37 जणांचा समावेश आहे.