ETV Bharat / state

प्रचार तोफा आज थंडावणार; गुप्त भेटींवर उमेदवार, कार्यकर्त्यांचा भर

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गडचिरोली शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गडचिरोली शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.
author img

By

Published : Apr 9, 2019, 5:28 PM IST

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी ९ एप्रिल म्हणजे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार असून आता गुप्त बैठकीवर उमेदवार व कार्यकर्त्यांचा भर राहणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गडचिरोली शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १८ मार्चपासून नामांकन भरण्याला सुरुवात झाली. तर 28 मार्चपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. गेली ८ दिवस जिल्हाभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. या काळात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची चामोर्शी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागभीड, गांगलवाडी, अहेरी, राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची गडचिरोली, कोरची तसेच पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची देसाईगंज (वडसा), चामोर्शी येथे, खासदार राजीव सातव यांची कुरखेडा, धानोरा, कोरेगाव येथे सभा तर विधिमंडळ उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्याही अनेक सभा झाल्या. तर वंचित बहुजन आघाडीने चामोर्शी येथे डॉ. प्रकाश आंबेडकर यांची सभा घेतली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गडचिरोली शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.

तीनही पक्षाने गडचिरोली, आरमोरी, चिमूर, ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या. मात्र एटापल्ली, भामरागड, कोरची, धानोरा, मुलचेरा या तालुक्यातील मतदारांपर्यंत आजही पोहोचू शकलेले नाही. दळणवळणाची साधने, मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा, दूरचित्रवाहिन्यांचा अभाव, यामुळे येथील मतदार आजही उमेदवार कोण यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे 'ना नेते पोहचले, ना पक्ष' असे ग्रामीण भागातील मतदार सांगत आहेत. परंतु प्रशासनाच्या जनजागृतीमुळे निवडणूक आहे आणि मतदान करावे लागणार, हे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळे निश्चितच या वर्षी दोन ते तीन टक्के मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मात्र, आता मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार असून गुप्त प्रचाराला वेग येणार आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर चिमूर व ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Intro:प्रचार तोफा आज थंडावणार ; गुप्त भेटीवर उमेदवार, कार्यकर्त्यांची भर

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 9 एप्रिल म्हणजे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावणार असून आता गुप्त बैठकीवर उमेदवार व कार्यकर्त्यांचा भर राहणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गडचिरोली शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपारिक लढत आहे.Body:निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 18 मार्चपासून नामांकन भरण्याला सुरुवात झाली. तर 28 मार्चपासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. गेली आठ दिवस जिल्हाभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. या काळात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची चामोर्शी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागभीड, गांगलवाडी, अहेरी, राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची गडचिरोली, कोरची तसेच पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची देसाईगंज (वडसा), चामोर्शी येथे, खासदार राजीव सातव यांची कुरखेडा, धानोरा, कोरेगाव येथे सभा तर विधिमंडळ उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्याही अनेक सभा झाल्या. तर वंचित बहुजन आघाडीने चामोर्शी येथे डॉ. प्रकाश आंबेडकर यांची सभा घेतली.

तीनही पक्षाने गडचिरोली, आरमोरी, चिमूर, ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या. मात्र एटापल्ली, भामरागड, कोरची, धानोरा, मुलचेरा या तालुक्यातील मतदारांपर्यंत आजही पोहोचू शकलेले नाही. दळणवळणाची साधने, मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा, दूरचित्रवाहिन्यांचा अभाव, यामुळे येथील मतदार आजही उमेदवार कोण यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ' ना नेते पोहचले, ना पक्ष' असे ग्रामीण भागातील मतदार सांगत आहेत. परंतु प्रशासनाच्या जनजागृतीमुळे निवडणूक आहे आणि मतदान करावे लागणार, हे मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळे निश्चितच या वर्षी दोन ते तीन टक्के मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मात्र आता मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार असून गुप्त प्रचाराला वेग येणार आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तर चिमूर व ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.