ETV Bharat / state

महाशिवरात्रीनिमित्त 'दक्षिण काशी' फुलली, शिवनाम स्मरणाने त्रिवेणी संगमावर भाविकांची गर्दी - दक्षिण काशी

तेलंगणा राज्यातील जयशंकर भूपालपल्लीतील १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या कालेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. कालेश्वर देवस्थान हे महाराष्ट्र सीमेलगत गोदावरी नदीच्या तीरावर आहे.

महाशिवरात्रीनिमित्त 'कालेश्वर'च्या त्रीवेणी संगमावर भाविकांची गर्दी

author img

By

Published : Feb 21, 2020, 6:25 PM IST

गडचिरोली - तेलंगणा राज्यातील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या कालेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. कालेश्वर हे महाराष्ट्र सीमेलगत तेलंगणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली या जिल्ह्यात आहे. येथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार या ३ दिवस महाशिवरात्रीच्या दरम्यान २ लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिर कमिटी इ.ओ. मारुती यांनी व्यक्त केला. तसेच भाविकांसाठीच्या सोयी सुविधांसाठी कमिटी पूर्णपणे सज्ज असल्याचीही माहिती दिली.

महाशिवरात्रीनिमित्त 'कालेश्वर'च्या त्रीवेणी संगमावर भाविकांची गर्दी

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे विभाजन करत वाहणाऱ्या गोदावरी, प्राणहिता आणि अंतर वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमावर कालेश्वर-मुक्तेश्वर हे प्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक असे हे कालेश्वर शिव मंदिर आहे. काशीला जाणे शक्य झाले नाही तर, कालेश्वर येथे जाऊन कालेश्वर-मुक्तेश्वर या जोड लिंगाचे दर्शन घेतल्यास पापनिवारण होऊन स्वर्गप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे १२ ही महिने भाविकांची गर्दी असते. अत्यंत पुरातन काळापासून काशी विश्वेश्वरनंतर कालेश्वर येथील शिव मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त आज पहाटेपासूनच शिव नामस्मरण करत मंदिरात गोदावरीत पुण्य स्नान करुन शिव पुजेसाठी हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावली.

हेही वाचा - विदर्भाची काशी मार्कंडादेव नगरीत गर्जला 'हर हर महादेव'चा जयघोष..

हेही वाचा - ..तर तेलंगणाच्या कालेश्वर प्रकल्पामध्ये उडी मारणार, आमदार आत्रामांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.