गडचिरोली - नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवान आणि एका वाहन चालकाला वीरमरण आले आहे. नागरिकांनी दबावाला बळी न पडता मतदान केल्याने नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचा दावा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मात्र निवडणूक आणि हल्ला यांचा काही संबंध नसल्याचे पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी म्हटले आहे. जयस्वाल यांच्या वक्तव्याने मुनगंटीवार तोंडघशी पडले आहेत.
गडचिरोलीमध्ये नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान केले. यामुळेच त्यांनी हा हल्ला केला. देशातील नक्षलवाद संपवणे ही काळाजी गरज आहे. एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत. तर दुसरीकडे नक्षलवादी त्यांचा हुकुमशाहीचा विचार पसरवत हिंसा करत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मात्र निवडणूक व नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला यांचा संबंध नसल्याचे पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी म्हटले आहे.